agriculture news in Marathi, inspiration to agri industry form news industrial policy, Maharashtra | Agrowon

कृषी उद्योगांना नव्या उद्योग धोरणात प्रोत्साहन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मार्च 2019

मुंबई: पुढील पाच वर्षांत १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४० लाख रोजगारनिर्मितीचे ध्येय असलेले राज्याचे नवे औद्योगिक धोरण मंगळवारी जाहीर करण्यात आले. नव्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी औद्योगिकदृष्ट्या अविकसित असलेल्या विदर्भ, मराठवाडा तसेच नक्षलग्रस्त भागासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आली आहेत. याशिवाय एमआयडीसीच्या क्षेत्रात लघु उद्योजक, महिला, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

मुंबई: पुढील पाच वर्षांत १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४० लाख रोजगारनिर्मितीचे ध्येय असलेले राज्याचे नवे औद्योगिक धोरण मंगळवारी जाहीर करण्यात आले. नव्या धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी औद्योगिकदृष्ट्या अविकसित असलेल्या विदर्भ, मराठवाडा तसेच नक्षलग्रस्त भागासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात आली आहेत. याशिवाय एमआयडीसीच्या क्षेत्रात लघु उद्योजक, महिला, अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळावी म्हणून मोठ्या आणि विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिकांना रोजगार देणे सर्व उद्योगांना बंधनकारक केले आहे. औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाची उत्पादकता वाढविण्यासाठी ''वॉक टू वर्क'' संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. पाच किलोमीटर परिसराच्या आत रहिवाशी इमारती उभारण्यासाठी अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक लागू करण्यात येणार आहे. 

प्रदूषणरहित प्रकल्पाच्या रहिवाशी क्षेत्रात सिनेमा थिएटर, मल्टीप्लेक्स, रुग्णालय, शाळा, प्रशिक्षण संस्था आदी उपक्रमांना परवानगी मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून लागू होणारे हे धोरण पुढील पाच वर्षांच्या कालावधी लागू असणार आहे. धोरणात ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कृषी आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. औद्योगिक विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा, विनाउद्योग जिल्हे, नक्षलग्रस्त भाग येथील उद्योगांना अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम
महाराष्ट्रातील स्थानिक तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १८ ते ४५ वयोगटांतील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करून प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी बँकेच्या माध्यमातून वित्तपुरवठा उपलब्ध करून देताना राज्य सरकारकडून भागभांडवल पुरवठा करण्यात येणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...
अंगावर काटा येणारच!देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुरेमध्ये दाखल...
कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा...सर विश्वेश्वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे...
कांदा दरवाढीचा कल कायम राहणारपुणे : केंद्र सरकारकृत एमएमटीसी या ट्रेडिंग...
साखर निर्यातीची अधिसूचना अखेर जारीपुणे : देशातील भरमसाठ साखरेचा साठा बघता ६० लाख टन...
जोर काहीसा ओसरला; मंगळवारपासून पावसाची...पुणे : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर काहीसा...
पूरस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत...मुंबई: जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट...
दरवर्षी १०० गावे आदर्श करणार ः...पुणे  : राज्याच्या ग्रामविकासाला आदर्श गाव...
‘समृद्धी’साठी २८ हजार कोटींचे कर्ज...मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग या...
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...
बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...
ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्षपुणे : राज्यातील साडेअकरा हजार कृषी सहायकांना...