कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे तातडीने करा नियंत्रण

कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे तातडीने करा नियंत्रण
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे तातडीने करा नियंत्रण

अकोला : सध्या कापूस पिकावर दिसून येत असलेल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने केल्या आहेत. कीटनाशकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. उंदीरवाडे यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतांची पाहणी केल्यानंतर याबाबत मार्गदर्शन केले आहे.  या वेळी डॉ. उंदीरवाडे म्हणाले, की शेतात सर्वसाधारण ३० ते ३५ टक्के फुलामध्ये प्रादुर्भाव झाल्यास सदर प्रादुर्भाव अन्यत्र पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या भागात कपाशीचे पीक ४५ दिवसांचे किंवा त्यापेक्षा जास्त मोठे झालेले आहे, तेथे कपाशीला फूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत गुलाबी बोंड अळीची मादी उमलत असलेल्या फुलाच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून दोन ते तीन दिवसांत सूक्ष्म अळया बाहेर येऊन फुलामध्ये प्रवेश करतात. उमलणाऱ्या पाकळया आतून तोंडातील धागाच्या साह्याने बंद करून अळी फुलामध्ये उपजीविका करते. अशा प्रादुर्भावग्रस्त फुलाला डोमकळ्या म्हणतात. त्यात हमखास गुलाबी बोंड अळी आपली उपजीविका करताना दिसते. फुलाच्या आतील भाग अळीने खाल्ल्यामुळे बहुधा फुलांचे रूपांतर बोंडामध्ये होत नाही, ते गळून पडतात व रूपांतर झाल्यास अळी बोंडामध्ये शिरून बोंड पोखरते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा करा उपाययोजना

  •    सर्व प्रथम पीक ९० दिवसांचे होईपर्यंत दर आठवड्यात पिकामध्ये सर्वेक्षण करून मजुराच्या साह्याने डोमकळ्या वेचून अळ्यांसहित नष्ट कराव्यात. 
  •    उपलब्धतेप्रमाणे एकरी तीन ट्रायकोकार्ड याप्रमाणे पात्या अवस्थेपासून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ६ ते ८ वेळा कपाशी पिकामध्ये लावावे. 
  •    प्रत्येक ट्रायकोर्डच्या २० पट्ट्या कापाव्यात, अशा एकूण ६० पट्ट्या कपाशी पिकामध्ये समसमान अंतरावर पिकाच्या खालच्या बाजूला टाचाव्यात.  
  •    त्वरित किमान एकरी दोन फेरोमाने सापळे लावावेत. सापळ्यातील अडकलेली पतंग किमान दर आठवड्याने नष्ट करावी व आवश्यकतेनुसार २० ते २५ दिवसांतून एकदा त्यातील ल्यूर बदलावे.   
  •    सापळ्यामध्ये पतंग अडकण्यास सुरुवात झाल्याबरोबर ५ टक्के निबोंळी किंवा ॲझाडिरेक्टीन (१५०० पीपीएम) २५ मिलि प्रति १० लिटर प्रमाणात फवारणी करावी.  
  •    विद्यापीठांच्या शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com