अकोला : पीककर्जासाठी डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा ग्राह्य धरण्याचे निर्देश 

अकोला ः जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे कामकाज बँक, सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडून सुरू करण्यात आले आहे. हे पीककर्ज देताना बँकांनी तलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सातबारा, नमुना आठ अ चा आग्रह न धरता डिजीटल स्वाक्षरीची कागदपत्रे ग्राह्य धरावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता तलाठ्यांना भेटण्याची धावपळ कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Instructions to accept digital signature 7/12 for crop loan
Instructions to accept digital signature 7/12 for crop loan

अकोला ः जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे कामकाज बँक, सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडून सुरू करण्यात आले आहे. हे पीककर्ज देताना बँकांनी तलाठ्यांच्या स्वाक्षरीचे सातबारा, नमुना आठ अ चा आग्रह न धरता डिजीटल स्वाक्षरीची कागदपत्रे ग्राह्य धरावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता तलाठ्यांना भेटण्याची धावपळ कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सध्या कोविड-१९ या आजाराचे संक्रमण रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनसंपर्क टाळणे आवश्यक झालेले आहे. त्यादृष्टीने राष्ट्रीयीकृत बँक, सेवा सहकारी सोसायटी यांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देताना तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा सातबारा, नमुना आठ अ चा आग्रह न धरता डिजीटल स्वाक्षरीची ही कागदपत्रे वापरावीत. 

संबंधित डिजीटल सातबारा, नमुना आठ अ हे महाईसेवा केंद्र, सीएससीसेंटर, आपले सरकार पोर्टल किंवा संग्राम केंद्र या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या प्रतिचा उपयोग संबंधित प्रकरणी करावा. शिवाय सदर सातबारा, नमुना आठ अ ची पडताळणी ही सबंधितास https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट वरून सुद्धा करता येईल. सर्वाकरीता ही कागदपत्रे उपलब्ध आहेत. 

पीक कर्जाकरीता नवीन फेरफार प्रतीची मागणी न करता संबधितांकडे उपलब्ध असलेल्या फेरफराच्या प्रतीची पाहणी करून सातबाराशी ताळमेळ घेऊन तीच प्रत ग्राह्य धरण्यात यावी, नवीन छायांकीत प्रतीची मागणी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. 

बँक, सेवांसह सोसायटी यांनी बोजा संबंधिचे पत्र सबंधित खातेदार यांच्याकडे न देता सदर पत्र हे ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या ई-हक्क प्रणालीव्दारे (httpsspdeise.maharashtra.gov.in संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविण्यात यावे. हीच पोच समजण्यात येईल. तलाठी यांनी सदर बोजाची नोंद सातबारावर घेतल्यानंतर ऑनलाइन प्रणालीमध्ये बोजाची नोंद संबंधित बँक यांना पाहण्याची सुविधा आहे. 

एक लाख ६० हजार मर्यादेपर्यंत सातबाऱ्यावर बोजा घेण्याची आवश्यकता नाही, असे नाबार्डचे निर्देश आहेत. या सुविधांचा वापर केल्यास एकाच ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही, असेही प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांनी बँकांना, सेवा सहकारी सोसायटींना कळविले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com