Agriculture news in Marathi Instructions to deposit in crop insurance savings account in Buldana | Agrowon

बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 मे 2020

बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा बँकांनी कर्जखात्यात जमा केला असून याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठविताच कृषी खात्याने बँकांना ही रक्कम बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटाच्या काळात पीकविम्याची मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा बँकांनी कर्जखात्यात जमा केला असून याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठविताच कृषी खात्याने बँकांना ही रक्कम बचत खात्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोरोना संकटाच्या काळात पीकविम्याची मदत मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात काही शेतकऱ्यांचा पीकविमा कर्ज खात्यात जमा करण्यात आला असून शेतकरी या लाभापासून वंचित होते. याविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कृषी खाते खडबडून जागे झाले. प्रामुख्याने संग्रामपूर तालुक्यातील बँकांनी कर्जखात्यात जमा केलेला पीकविमा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर होऊन बँकांनी कर्जखात्यात जमा केला होता. मुळात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची रक्कम कर्ज खात्यात जमा करणे किंवा रोखून ठेवणे हे नियमबाह्य आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या दिवसामध्ये शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. पेरणीला लागणारे खते, बी-बियाणे खरेदी करायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्‍नावर स्वाभिमानीने आवाज उठविला होता. त्याची कृषी विभागाने तातडीने दखल घेत आदेश दिले आहेत.

बँकांनी शेतकऱ्यांच्या विरोधात आडमुठी भूमिका न घेता शेतकऱ्यांकडून पीकविम्यासंदर्भात आलेले अर्जानुसार तत्काळ रक्कम बचत खात्यात वर्ग करावी. बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास त्या बँकेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा आंदोलनाचे शस्त्र हातात घेईल, असा इशारा संघटनेचे विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी बँकांना दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...