जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर तूर खरेदीचे निर्देश

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर तूर खरेदीचे निर्देश
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर तूर खरेदीचे निर्देश

अकोला  ः या हंगामात तूर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने अकोला आणि वाशीम जिल्ह्यात एकूण आठ केंद्रांवर खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. या खरेदीसाठी अकोला व वाशीम जिल्ह्यात एकूण १६ हजारांवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठविले जात आहेत, अशी माहिती फेडरेशनच्या सूत्राने दिली. या हंगामात आधारभूत दराने तूर खरेदीसाठी शुक्रवारी (ता. ७) निर्देश देण्यात आले. त्यानंतर अकोला जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने पातूर, बाळापूर, तेल्हारा आणि पारस या चार केंद्रांवर खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. या चार ठिकाणी आत्तापर्यंत पाच हजार ८२८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांना टप्‍प्याटप्प्याने मेसेज पाठविणे सुरू झाले. वाशीम जिल्ह्यात वाशीम, रिसोड, मानोरा, मालेगाव या चार केंद्रावर खरेदी केली जाणार आहे. या जिल्ह्यात दहा हजार २६० शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना विक्रीसाठी तूर आणण्याबाबत मेसेज पाठविण्यात येत आहेत.  आर्द्रता हवी १२ टक्के  तूर खरेदी करताना शासकीय नियमानुसार या धान्याची आर्द्रता ही १२ टक्क्यांच्या आत असणे गरजेचे आहे. यापेक्षा अधिक असेल तर हा माल घेतला जात नाही. सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीमध्ये १२ पेक्षा अधिक आर्द्रता मिळून येत आहे. त्यामुळे मोजमापाची गती वाढण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. हेक्टरी घेणार एवढी तूर  आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर नोंदणी असलेला पीकपेरा ग्राह्य धरण्यात येत आहे. खरेदी करण्यासाठी हेक्टरी प्रतिक्विंटल मर्यादा घालण्यात आलेली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात हेक्टरी ९६६ किलो, तर वाशीममध्ये ४७८.८० किलो तूर शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे.   मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्रे  अकोला जिल्हा - पातूर, बाळापूर, तेल्हारा, पारस; वाशीम जिल्हा - वाशीम, रिसोड, मानोरा आणि मालेगाव 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com