पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा

पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या पलटी नांगर किंवा कृषी अवजारे योजनेपासून अनेक अर्जदार शेतकरी वंचित राहणार असल्याची स्थिती आहे. कमी निधी व अधिकचे मागणी अर्ज यांमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. निधी अधिकचा मिळण्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.  पलटी नांगर योजनेला शेतकऱ्यांतर्फे चांगला प्रतिसाद मिळतो. ही योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या देखरेखीखाली पंचायत समित्यांतर्फे राबविली जाते. पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकारी यांच्याकडे कार्यवाही असते. पंचायत समितीतर्फे प्रस्ताव मागविले जातात. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे या योजनेसाठी स्वनिधीतून प्रतिनांगर २५ हजार रुपये निधी दिला जातो. बाजारात नांगराचे दर ६० हजार ते ८० हजारांपर्यंत पोचल्याने हा निधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, निधीची तरतूद फारशी वाढविलेली नाही. सुमारे १५ ते २० लाख रुपये निधी या योजनेसाठी दिला जाईल. यातून ५० लाभार्थीदेखील कव्हर होणार नाहीत. अर्ज किंवा मागणी मात्र सुमारे १५० शेतकऱ्यांकडून आहे. यात अनेक प्रस्ताव जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. यामुळे हे अर्ज मार्गी लावण्याचा दबावही प्रशासनावर आहे. डीबीटी पद्धतीने ही योजना राबविली जाते. परंतु, सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून या योजनेबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसंबंधी यंदा कार्यवाही वेगाने झाली असून, अनुदानासंबंधीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत.  लवकरच अनुदान वितरणदेखील होईल. परंतु, सुमारे १५० शेतकरी या योजनेपासून यंदा वंचित राहणार आहेत. यामुळे तरतूद वाढवून अधिकाधिक शेतकरी कसे कव्हर केले जातील, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com