Agriculture news in marathi Insufficient funds for the palti nagar yojana | Agrowon

पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या पलटी नांगर किंवा कृषी अवजारे योजनेपासून अनेक अर्जदार शेतकरी वंचित राहणार असल्याची स्थिती आहे. कमी निधी व अधिकचे मागणी अर्ज यांमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. निधी अधिकचा मिळण्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या पलटी नांगर किंवा कृषी अवजारे योजनेपासून अनेक अर्जदार शेतकरी वंचित राहणार असल्याची स्थिती आहे. कमी निधी व अधिकचे मागणी अर्ज यांमुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. निधी अधिकचा मिळण्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

पलटी नांगर योजनेला शेतकऱ्यांतर्फे चांगला प्रतिसाद मिळतो. ही योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या देखरेखीखाली पंचायत समित्यांतर्फे राबविली जाते. पंचायत समिती स्तरावर कृषी विस्तार अधिकारी यांच्याकडे कार्यवाही असते. पंचायत समितीतर्फे प्रस्ताव मागविले जातात. जळगाव जिल्हा परिषदेतर्फे या योजनेसाठी स्वनिधीतून प्रतिनांगर २५ हजार रुपये निधी दिला जातो. बाजारात नांगराचे दर ६० हजार ते ८० हजारांपर्यंत पोचल्याने हा निधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, निधीची तरतूद फारशी वाढविलेली नाही. सुमारे १५ ते २० लाख रुपये निधी या योजनेसाठी दिला जाईल. यातून ५० लाभार्थीदेखील कव्हर होणार नाहीत. अर्ज किंवा मागणी मात्र सुमारे १५० शेतकऱ्यांकडून आहे. यात अनेक प्रस्ताव जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. यामुळे हे अर्ज मार्गी लावण्याचा दबावही प्रशासनावर आहे. डीबीटी पद्धतीने ही योजना राबविली जाते. परंतु, सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून या योजनेबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसंबंधी यंदा कार्यवाही वेगाने झाली असून, अनुदानासंबंधीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. 

लवकरच अनुदान वितरणदेखील होईल. परंतु, सुमारे १५० शेतकरी या योजनेपासून यंदा वंचित राहणार आहेत. यामुळे तरतूद वाढवून अधिकाधिक शेतकरी कसे कव्हर केले जातील, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


इतर बातम्या
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
नैसर्गिक रंग बनविण्याचे महिलांनी...अकोला  ः पुढील महिन्यात रंगपंचमीचा उत्सव जवळ...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...