agriculture news in Marathi insufficient package for farmers Maharashtra | Agrowon

मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ. अजित नवले 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राच्या निकषांपेक्षा थोडी अधिकची तरतूद करून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.

नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राच्या निकषांपेक्षा थोडी अधिकची तरतूद करून शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. याबद्दल किसानसभेकडून सरकारचे स्वागत. मात्र, पावसाने झालेले नुकसान पाहता ही मदत कमी असून त्यात वाढ करावी व दोन हेक्टरची मर्यादाही काढून टाकावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे. 

डॉ. नवले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे व ज्या प्रमाणात नुकसान झाले ते पाहता पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १० हजार रुपये व फळ पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये ही मदत अत्यल्प आहे. दिवाळी गोड होणे दूरच, वाया गेलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही या मदतीतून भरून निघणार नाही हे वास्तव आहे. शिवाय मदत २ हेक्टरच्या मर्यादेतच मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्वरूप पाहता अशी मर्यादा टाकणे अयोग्य आहे. राज्य सरकारने या बाबींचा विचार करून मदतीच्या रकमेत वाढ करावी व २ हेक्टरची मर्यादा काढून टाकावी. 

विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यात नेहमीच टाळाटाळ करत आलेल्या आहेत. आताच्या संकटातही विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कसे टाळता येईल असाच त्यांचा प्रयत्न दिसत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीव्यतिरिक्त विमा कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी सरकारच्या यंत्रणांनी गांभीर्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. 

केंद्राकडून उपेक्षा 
राज्य सरकारने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बाबत वारंवार कळविले. मात्र तरीही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पुरेशी दखल घेतली नाही की पाहणीसाठी पथक पाठविण्याची तसदीही घेतली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची केलेली ही उपेक्षा संतापजनक आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करावी. 
 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...