Agriculture news in marathi Insurance amount for Loha and Mahur talukas is zero | Agrowon

लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम शून्य 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 मे 2021

माहूर तसेच लोहा तालुक्याला एकही रुपया विमा मंजूर झाला नाही. यामुळे कोट्यवधींचा विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे.

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२० मधील उत्पन्न आधारित नुकसान झालेल्या ३९ हजार २६९ शेतकऱ्‍यांना २१ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. यात सर्वाधिक १६ कोटी ३५ लाखांचा विमा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्याला मिळाला आहे. तर माहूर तसेच लोहा तालुक्याला एकही रुपया विमा मंजूर झाला नाही. यामुळे कोट्यवधींचा विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्‍यांमध्ये नाराजी पसरली आहे. 

पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांनी ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, उडीद व मूग या पिकांसाठी एकूण नऊ लाख ५५ हजार आठशे ४४ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा हप्ता इफ्को टोकियो विमा कंपनीकडे विमा भरला होता. पिके उभे असताना यंदा अतिवृष्टी झाली होती. यात अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केलेल्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीपश्‍चात नुकसान झालेल्या ८२ हजार ३३३ शेतकऱ्‍यांना एकूण ७५ कोटी ८४ लाखांची भरपाई मिळाली होती. यानंतर शिल्लक शेतकऱ्यांना उत्पन्न आधारित नुकसानभरपाईची प्रतीक्षा होती. कंपनीकडून नुकताच विमा मंजुरीबाबत तपशील जाहीर केला आहे. 

यात जिल्हा परिषद, कृषी विभाग व महसूल अशा तीन यंत्रणेने काढलेल्या पीक प्रयोगाच्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर जिल्ह्यातील ३९ हजार २६९ शेतकऱ्यांना २१ कोटी ९७ लाख ९१ हजार रुपयांचा विमा मंजूर झाल्याचे कळविले. उत्पन्न आधारित विमा नुकसानभरपाईमध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघातील भोकर तालुक्याला सर्वाधिक १६ कोटी ३५ लाख रुपये विमा मंजूर झाला आहे. तर माहूर तसेच लोहा तालुक्यातील शेतकऱ्‍यांना मात्र भरपाई मिळाली नाही. 

तालुकानिहाय मंजूर पीकविमा (कंसात शेतकरी संख्या) ः अर्धापूर - ४३.७८ लाख (१४७), भोकर - १६.३५ कोटी (१९८३७), देगलूर - १.२८ कोटी (२६०६), धर्माबाद - ८५ हजार (४३), हदगाव - ११.०८ लाख (४३२), हिमायतनगर - ८५.५९ लाख (३४६४), कंधार - एक कोटी (४३९०), किनवट - ५७.७९ लाख (२१७४), लोहा - शून्य, माहूर - शून्य, मुदखेड - ४.३३ लाख (१००), मुखेड - १.७५ लाख (८६), नायगाव - १.१२ कोटी (२९८९), नांदेड - ८.०८ लाख (३३१), उमरी - ३९.२८ लाख (२५५३), बिलोली - ७.१० लाख (११७). 


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...