कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा लागू

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना लागू करण्यात आला आहे.
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा लागू
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा लागू

पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना लागू करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अपघात झालेल्या व्यक्तींना व कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणत्याही एक सदस्याचा समावेश आहे. यामध्ये आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांपैकी कोणत्याही एका व्यक्तींना प्राधान्य राहील. सर्व १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना योजना राबविण्यास १९ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे १ कोटी ५२ लाख वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणत्याही एक सदस्याचा देखील या विमा योजनेअंतर्गत समावेश करून एकूण ३ कोटी ४ लाख जणांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. खातेदार शेतकऱ्यांच्या वतीने शासन स्वतः विमा हप्ता भरते. कार्यक्षेत्रातील एखादा वहितीधारक शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास योजनेचा लाभ होऊ शकतो. दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांची यादी दर महिन्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना उपलब्ध करुण देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुटुंबास पात्र मदत मिळण्यासाठी विमा प्रस्ताव विमा कंपनीस सादर करता येईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com