agriculture news in Marathi insurance benefit to family member Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा लागू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना लागू करण्यात आला आहे.

पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यांना लागू करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ अपघात झालेल्या व्यक्तींना व कुटुंबांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०१५-१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणत्याही एक सदस्याचा समावेश आहे. यामध्ये आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांपैकी कोणत्याही एका व्यक्तींना प्राधान्य राहील.

सर्व १० ते ७५ वयोगटातील एकूण दोन जणांना योजना राबविण्यास १९ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे १ कोटी ५२ लाख वहितीधारक खातेदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणत्याही एक सदस्याचा देखील या विमा योजनेअंतर्गत समावेश करून एकूण ३ कोटी ४ लाख जणांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. खातेदार शेतकऱ्यांच्या वतीने शासन स्वतः विमा हप्ता भरते.

कार्यक्षेत्रातील एखादा वहितीधारक शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व आल्यास त्याच्या वारसदारास योजनेचा लाभ होऊ शकतो. दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांची यादी दर महिन्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना उपलब्ध करुण देण्यात यावी. जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुटुंबास पात्र मदत मिळण्यासाठी विमा प्रस्ताव विमा कंपनीस सादर करता येईल, अशीही माहिती सूत्रांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात उकाडा वाढण्यास सुरूवात  पुणे ः परतीच्या पावसाने संपूर्ण देशातून माघार...
पीकविमा परतावा तात्काळ द्या, अन्यथा...अमरावती : जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (ॲग्रिकल्चर...
कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेनाजळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली....
बांगलादेशमधील संत्रा निर्यात लांबणीवरनागपूर : तांत्रिक कारणांमुळे बांगलादेशमध्ये...
साखरेचे नवे निर्यात करार ठप्पकोल्हापूर: देशातील साखर हंगामास सुरवात होत असली...
‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...
व्यवहारापलिकडचा विचारदसऱ्याच्या पर्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘...
आत्मनिर्भर नव्हे, समृद्ध होऊ याशेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते स्व. भास्करभाऊ बोरावके...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी...मुंबई: गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण...
व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं...
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या...नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना...
कांदा दर पाडण्याचा डावनाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कांदा लिलाव...
शेतकऱ्यांना मिळणार पिकांचे नवे १६ वाणपुणे: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
उन्हाचा चटका वाढू लागलापुणे ः राज्यात पावसाने उघडीप देण्यास सुरूवात केली...
राज्यात सुधारित अंदाजानुसार ५९ लाख टन...पुणे: राज्यात यंदा उसाची उपलब्धता सुधारित...
‘पीएम-किसान’मध्ये बोगस लाभार्थींनी...मालेगाव, जि. नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान...
शेतीसाठी परिपूर्ण आराखडा तयार करा:...अकोला : शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेली अस्थिरता...
व्यापाऱ्यांच्या मुजोरीला शेतकऱ्यांचे...अमरावती : ‘जशास तसे’च्या धर्तीवर उत्तर देत...
सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणारपुणे: राज्यात पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान...
आधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...