Agriculture news in marathi Insurance cleared for Mog, Udid victims in Washim | Agrowon

वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना विमा मंजूर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान झालेल्या मूग, उडीद या पिकांसाठी कंपनीने विमा मंजूर केला आहे. जिल्ह्यातील १० हजार ६१ शेतकऱ्यांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये विमा मंजूर केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सर्वच पिकांच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. विमा कंपनीकडून मूग, उडीद पिकांसाठी सामुदायिक क्लेम मंजूर करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर ही विमा रक्कम मंजूर  झाली आहे. 

वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान झालेल्या मूग, उडीद या पिकांसाठी कंपनीने विमा मंजूर केला आहे. जिल्ह्यातील १० हजार ६१ शेतकऱ्यांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये विमा मंजूर केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सर्वच पिकांच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. विमा कंपनीकडून मूग, उडीद पिकांसाठी सामुदायिक क्लेम मंजूर करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर ही विमा रक्कम मंजूर  झाली आहे. 

जिल्ह्यातील २७ हजारांवर शेतकऱ्यांनी मूग, उडीद पिकांचा विमा काढला होता. यासाठी ४७ लाख ५७ हजार ४४२ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. विमा कंपनीने सामुदायिक स्तरावर या दोन्ही पिकांसाठी क्लेम मंजूर केला. याचा १० हजार ६१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ८१ लाख ४१ हजार रुपये विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जात आहे. 

उडीद पिकासाठी कारंजा तालुक्यात २०३४, मालेगाव ८६७, मंगरुळपीर ३३८९, मानोरा ७५२ असे एकूण ७०४२ शेतकऱ्यांना तर मूग पिकासाठी कारंजा तालुका १६७९, मालेगाव तालुका १५५, मंगरुळपीर तालुका ११८५ असा एकूण ३०१९ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जाणार आहे. या दोन्ही पिकांच्या १० हजार ६१ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळत आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...