Agriculture news in Marathi Insurance companies reach out to farmers less | Page 2 ||| Agrowon

सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पडतेय कमी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

यंत्रणा असूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात कंपनी मात्र कमी पडत आहे. अधिकारी भेटत नाहीत, दखल घेतली जात नाही, विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम आहेत.

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती अॅक्सा विमा कंपनीकडे जबाबदारी आहे. सोलापुरात कंपनीचे कार्यालय आहे. शिवाय कृषी विभागानेही त्यांच्या कार्यालयात कंपनीच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी जागा दिली आहे. कंपनीचे डझनभर प्रतिनिधी जिल्ह्यात कार्यरत आहेत. एवढी यंत्रणा असूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात कंपनी मात्र कमी पडत आहे. अधिकारी भेटत नाहीत, दखल घेतली जात नाही, विमा मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी कायम आहेत.

सोलापूर जिल्हा हा रब्बीचा म्हणून गणला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात खरिपातही मोठ्या प्रमाणात पिके होत आहेत. खरिपात जवळपास पावणेचार लाख हेक्टर आणि रब्बीत आठ लाख हेक्टरपर्यंत पेरणीचे क्षेत्र आहे. या दोन्ही हंगामांतील किमान ५० ते ७० टक्के शेतकरी पिकांसाठी हमखास विमा उतरवतातच. जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष या फळांसाठी आणि धान्यामध्ये तूर, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठी शेतकरी विमा हप्ता भरतात. पण विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांचे अनुभव वाईट आहेत. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांचे हेल्पलाइन माहीत नाहीत, नेमकी तक्रार कुठे करायची, हेही माहीत नाही. 

याबाबत वांगी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी काकासाहेब सुपाते म्हणाले, ‘‘गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी ज्वारी, तूर, सोयाबीनसाठी विमा उतरवतो आहे. गेल्या वर्षी एक एकर ज्वारी, एकएकर सोयाबीनचा विमा उतरवला. ७०० रुपये बँकेत हप्ताही भरला. त्याचवेळी अतिवृष्टीने नुकसान झाले. तक्रार कुठे करायची, कुणाला सांगायचं, हे मला माहितीच नाही. बँकेत, कृषी विभागाकडे गेलो, पण दाद मिळाली नाही.’’ 

परिते (ता. माढा) येथील दादासाहेब देशमुख यांचे यंदाही गेल्या आठवड्यात ५० एकर डाळिंबाचे नुकसान झाले आहे. मृग बहरातील डाळिंबासाठी बँकेच्या कर्जातून त्यांचा विमा हप्ता कपात झाला आहे. जवळपास ७५ हजारांहून अधिक रक्कम कापली गेली आहे. या नुकसानीबाबत नियमानुसार लगेच त्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार केली. पण अद्यापही कंपनीचा प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. गेल्या वर्षीही जवळपास अडीच लाखांपेक्षा अधिक विमा हप्ता भरला. त्या वेळीही २५ एकर डाळिंबाचे नुकसान झाले, पण ती मदत अद्यापही त्यांच्या वाट्याला आली नाही. खर्डी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी औदुंबर खताळ यांचीही तक्रार अशीच आहे. त्यांनीही गेल्या वर्षी विमा हप्ता भरला, पण अद्याप तो त्यांना मिळाला नाही.

कंपन्यांकडून कारणांचा पाढा
सोलापूर जिल्ह्यासाठी भारती अॅक्सा विमा कंपनी नियुक्त केली आहे. सोलापुरातील स्टेशनरोड परिसरात या कंपनीचे कार्यालय आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात त्यांना बसण्यासाठी जागाही देण्यात आली आहे. त्याशिवाय कंपनीचे १३ प्रतिनिधी जिल्ह्यात कार्यरत आहेत. पण तरीही शेतकऱ्यांना विम्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यापासून तो मिळेपर्यंत हेलपाटे मारावे लागतात. कृषी विभागाकडून पंचनामा पूर्ण नाही, नुकसान ग्राह्य धरण्याएवढा पाऊस झाला नाही, अशी एक ना अनेक कारणे देऊन शेतकऱ्यांना पिटाळले जाते. पण कंपनीचे प्रतिनिधी नागेश बोडाडा यांनी मात्र असं काही नाही, आमची यंत्रणा प्रत्येक तालुक्यापर्यंत पोहोचते, असं स्पष्टीकरण दिलं.


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...