विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस ! पीक नुकसानीने शेतकरी हतबल !!

राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत साडेआठ लाखांपेक्षा जास्त ‘पूर्वसूचना’ विमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत.
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस ! पीक नुकसानीने शेतकरी हतबल !!
विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस ! पीक नुकसानीने शेतकरी हतबल !!

पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत साडेआठ लाखांपेक्षा जास्त ‘पूर्वसूचना’ विमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत. नफ्याची चटक लागलेल्या विमा कंपन्या मात्र पूर्वसूचनांचा हा पाऊस पाहून हबकून गेल्या आहेत.  अब्जावधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या विमा कंपन्या भरपूर विमाहप्ता गोळा करतात. मात्र नुकसान झाल्यानंतर बेपत्ता होतात. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना सतत आंदोलने करावी लागतात. नफेखोर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कसे वाऱ्यावर सोडले आहे, याबाबत ‘अॅग्रोवन’ने पुराव्यानिशी कैफियत मांडली होती. कृषिमंत्री दादा भुसे यांनीही कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या बाजूला कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही कठोर भूमिका घेत शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना कंपन्यांनी दाखल करू घेतल्याच पाहिजे, अशी सक्ती केली. त्याचा एकत्रित परिणाम आता राज्यभर दिसू लागला आहे.  कोणत्या कंपनीने काय कामे केली... 

कंपनी आलेल्या पूर्वसूचना पाहणी पूर्ण  केलेली प्रकरणे
भारती अॅक्सा ६६५८० २५०६३
रिलायन्स जनरल १५३९९४ १२९२४६
इफ्को टोकिओ २४७९६० १७००९५
एचडीएफसी इर्गो २२७९६३ ११४२६५
बजाज एलिअॅन्झ ४२६२५ १८६१७
सरकारी विमा (एआयसी) कंपनी १४८०७७ १६०४७

कृषी विस्तार संचालक विकास पाटील व मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्याकडूनही विमा कंपन्यांच्या गोंधळाचा जिल्हानिहाय आढावा घेतला जात आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कार्यालये उघडली गेली 

असून, तक्रारी दाखल करून घेण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. परिणामी राज्यात आता रोज एक लाख पूर्वसूचना दाखल होत आहेत. आतापर्यंत ८.८७ लाख पूर्वसूचना आलेल्या आहेत. नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत पूर्वसूचना देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असते आणि अशी सूचना मिळताच पाहणी करून योग्य ठिकाणी भरपाई देण्याची अट कंपन्यांवर असते. 

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पूर्वसूचनांप्रमाणे राज्यभर पीकस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. आतापर्यंत ४.७३ लाख पूर्वसूचनांची शेतस्थळ पाहणी (इंटिमेशन सर्वे) पूर्ण झाली आहे. कामे पूर्ण झालेली आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे, की नाही,  याबाबत ही तपासणी केली जात आहे. ही घट जास्त आढळली, तर असे शेतकरी २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ नुकसानभरपाई द्यावी लागते.”   गेल्या हंगामात राज्यातील ५.२० लाख शेतकऱ्यांना अंदाजे ३९२ कोटी रुपये विमा कंपन्यांनी दिले होते. यंदा नुकसान मोठे असून, पूर्वसूचनादेखील जास्त आहेत. विमा कंपन्यांनी कामचुकारपणा करू नये यासाठी सध्या जास्त पाठपुरावा केला जात असल्यामुळे यंदा नुकसानभरपाईची रक्कम जास्त असू शकेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com