agriculture news in marathi insurance companies receives huge crop damage Entries | Page 2 ||| Agrowon

विमा कंपन्यांवर पूर्वसूचनांचा पाऊस ! पीक नुकसानीने शेतकरी हतबल !!

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021

राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत साडेआठ लाखांपेक्षा जास्त ‘पूर्वसूचना’ विमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत.

पुणे : राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापर्यंत साडेआठ लाखांपेक्षा जास्त ‘पूर्वसूचना’ विमा कंपन्यांकडे दाखल केल्या आहेत. नफ्याची चटक लागलेल्या विमा कंपन्या मात्र पूर्वसूचनांचा हा पाऊस पाहून हबकून गेल्या आहेत. 

अब्जावधी रुपयांचा नफा कमावणाऱ्या विमा कंपन्या भरपूर विमाहप्ता गोळा करतात. मात्र नुकसान झाल्यानंतर बेपत्ता होतात. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना सतत आंदोलने करावी लागतात. नफेखोर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना कसे वाऱ्यावर सोडले आहे, याबाबत ‘अॅग्रोवन’ने पुराव्यानिशी कैफियत मांडली होती. कृषिमंत्री दादा भुसे यांनीही कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. दुसऱ्या बाजूला कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही कठोर भूमिका घेत शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना कंपन्यांनी दाखल करू घेतल्याच पाहिजे, अशी सक्ती केली. त्याचा एकत्रित परिणाम आता राज्यभर दिसू लागला आहे. 

कोणत्या कंपनीने काय कामे केली... 

कंपनी आलेल्या पूर्वसूचना पाहणी पूर्ण 
केलेली प्रकरणे
भारती अॅक्सा ६६५८० २५०६३
रिलायन्स जनरल १५३९९४ १२९२४६
इफ्को टोकिओ २४७९६० १७००९५
एचडीएफसी इर्गो २२७९६३ ११४२६५
बजाज एलिअॅन्झ ४२६२५ १८६१७
सरकारी विमा (एआयसी) कंपनी १४८०७७ १६०४७

कृषी विस्तार संचालक विकास पाटील व मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांच्याकडूनही विमा कंपन्यांच्या गोंधळाचा जिल्हानिहाय आढावा घेतला जात आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कार्यालये उघडली गेली 

असून, तक्रारी दाखल करून घेण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. परिणामी राज्यात आता रोज एक लाख पूर्वसूचना दाखल होत आहेत. आतापर्यंत ८.८७ लाख पूर्वसूचना आलेल्या आहेत. नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत पूर्वसूचना देण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असते आणि अशी सूचना मिळताच पाहणी करून योग्य ठिकाणी भरपाई देण्याची अट कंपन्यांवर असते. 

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पूर्वसूचनांप्रमाणे राज्यभर पीकस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही कंपन्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. आतापर्यंत ४.७३ लाख पूर्वसूचनांची शेतस्थळ पाहणी (इंटिमेशन सर्वे) पूर्ण झाली आहे. कामे पूर्ण झालेली आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित आहे, की नाही,  याबाबत ही तपासणी केली जात आहे. ही घट जास्त आढळली, तर असे शेतकरी २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ नुकसानभरपाई द्यावी लागते.”
 
गेल्या हंगामात राज्यातील ५.२० लाख शेतकऱ्यांना अंदाजे ३९२ कोटी रुपये विमा कंपन्यांनी दिले होते. यंदा नुकसान मोठे असून, पूर्वसूचनादेखील जास्त आहेत. विमा कंपन्यांनी कामचुकारपणा करू नये यासाठी सध्या जास्त पाठपुरावा केला जात असल्यामुळे यंदा नुकसानभरपाईची रक्कम जास्त असू शकेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.


इतर अॅग्रो विशेष
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....