Agriculture news in Marathi, The insurance company fights the Shiv sena | Page 2 ||| Agrowon

विमा कंपनीला शिवसेनेचा दणका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पुणे ः राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा नाकारणाऱ्या इफ्को टोकियो या विमा कंपनीला शिवसेनेने बुधवारी (ता. ६) दणका दिला. कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावर असलेल्या इफ्को टोकियो विमा कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडक देत शिवसैनिकांनी कार्यालय तोडून जाब विचारला. 

पुणे ः राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा नाकारणाऱ्या इफ्को टोकियो या विमा कंपनीला शिवसेनेने बुधवारी (ता. ६) दणका दिला. कोरेगाव पार्क येथील मंगलदास रस्त्यावर असलेल्या इफ्को टोकियो विमा कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडक देत शिवसैनिकांनी कार्यालय तोडून जाब विचारला. 

विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे दिले जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील दौऱ्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडल्या. विमा कंपन्याच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असल्यामुळे आज शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि नगरसेवक विशाल धनवडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील मंगलदास रोडवरील इफ्को टोकियो कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कंपनीचे कार्यालय उघडताच शिवसैनिक आत घुसले. 

शेतकऱ्यांना पीकविमा का नाकारता, ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्यांना पीकविमा मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून कोणतीही उत्तरे न मिळाल्याने संतप्त शिवसैनिकांनी ‘शिवसेना स्टाइल’ आंदोलन करून कंपनीला हिसका दाखविला. इफ्को टोकियो कंपनीकडे राज्यातील औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, ठाणे, वर्धा, अमरावती, भंडारा, परभणी आणि पुणे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. दोन लाख शेतकऱ्यांचे ४२ कोटी रुपये विमा कंपनीकडे थकीत आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे पैसे मिळावे, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी विमा कंपन्यांवर आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी पीकविम्याचे पैसे दिले जातील, असे आश्‍वासन दिले गेले. आज शेतकरी संकटात आहेत. पिके वाया गेली आहेत. पावसाने नुकसान केले. पुन्हा पीक घेण्यासाठी नांगरणी आणि बियाणे खरेदीसाठीदेखील मोठा खर्च झाला आहे. म्हणून विमा कंपन्यांना जाग आणून धडा शिकविण्यासाठी शिवसेनेचा हा लढा आहे.
- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...