Agriculture news in marathi The insurance company is running From the office of the Department of Agriculture | Page 3 ||| Agrowon

विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी विभागाच्या कार्यालयातून

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

सातारा जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने मारलेली दडी व गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांसाठी  पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली आहे.

सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने मारलेली दडी व गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांसाठी  पंतप्रधान पीकविमा योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात भारतीय एक्सा या कंपनीकडे काम दिले असून, कंपनीचे जिल्ह्याच्या ठिकाणी अद्याप स्वतंत्र कार्यालय नाही. सध्या या कंपन्यांचा कारभार कृषी विभागाच्या कार्यालयातून केला जात आहे.

खरिपामध्ये हंगामात जिल्ह्यात शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत दर वर्षी सहभागी होतात. भारतीय एक्सा  या कंपनीकडे काम सोपविण्यात आले आहे. परंतु या कंपनीचे स्वतंत्र कार्यालय मात्र अस्तित्वात नाही. कृषी विभागाच्या कार्यालयातून या ठिकाणाहून कंपनीचे काम चालते. यामुळे विमा नक्की कोण घेते या बाबत माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. 

जिल्ह्यासाठी १८००१०३७७१२, हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात नजर अंदाजे पाच हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे पूर्ण झाल्यावर अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे. परंतु अतिवृष्टीनंतर सर्वच शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी धडपड सुरू असल्याने ७२ तासांत अनेकांना संपर्क करणे शक्य होत नसल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहातात. कृषी विभागाच्या कार्यालयातून काम चालत असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांना आपण कोणत्या कंपनीचा पीकविमा घेतो येही समजत नाही. कारण विमा घेण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याने भरपाई कृषी विभागाकडून मिळते, असा शेतकऱ्यांचा समज होत आहे.

स्वतंत्र व्यवस्थेची गरज
पीकविमा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. मात्र यासाठी विमा कंपन्यांकडून स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. यामध्ये प्रत्येक तालुकास्तरावर कार्यालय असणे गरजेचे आहे. तसेच ७२ तासांच्या आत संपर्क करण्याची अट शिथिल करून कालावधी वाढविणे गरजेचे आहे. यामुळे शेतकरी वंचित राहण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच पीकविमा घ्यावा यासाठी संपर्क केला जातो. त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी संपर्क करण्यापेक्षा ठराविक कालावधीमध्ये कंपन्यांकडून संपर्क करणे आवश्यक आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करा ः...दापोली, जि. रत्नागिरी ः शेती करणे हे जगातील...
पीकविमाप्रश्‍नी चूल बंद आंदोलनाला...निफाड, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात दोन...
‘कादवा’ करणार सीएनजी निर्मिती ः अध्यक्ष...नाशिक : साखर उद्योग मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण...
मेघोली तलाव फुटून शेतीचे नुकसानकोल्हापूर ः मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू तलाव...
नगर, शेवगाव, पाथर्डीत पावसाने नुकसाननगर ः शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत दोन...
खडकपूर्णा प्रकल्पाचे तीन गेट उघडले बुलडाणा ः मराठवाड्यात होत असलेल्या पावसाचा फायदा...
पीकविमा न देणाऱ्या ११ बँकांवर कारवाईजळगाव ः जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकऱ्यांनी...
डॉ. आढाव, रावल यांना आबासाहेब वीर...सातारा : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव...
मराठवाड्यात ६७ मंडळांत अतिवृष्टीऔरंगाबाद : कायम लहरीपणाचा परिचय देणारा पाऊस...
कपाशी, मिरची पिकांत वाढली ‘मर’औरंगाबाद : पावसाची उघडीप मिळाली असताना आता...
सरकारकडून तिसऱ्या लाटेचा बाऊ ः...नागपूर : राज्य सरकार स्वतःचे अपयश लपविण्यासाठी...
यंदाही बैलपोळा सण साजरा होणार की नाही?अकोला ः गेल्यावर्षात कोरोना निर्बंधामुळे पोळा...
चालते-बोलते विद्यापीठ काळाच्या पडद्याआडपुणे : डॉ. ज्ञानदेव हापसे हे ऊस विज्ञानाचे चालते-...
रब्बी पीक प्रात्यक्षिक अर्जाला आजपासून...हिंगोली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (अन्नधान्य...
निकृष्ट साहित्य मारले शेतकऱ्यांच्या माथीनागपूर ः गैरप्रकारांना चाप बसावा याकरिता थेट...
सोलापूर : भाजीपाल्यांचे दर दबावाखालीसोलापूर : आधीच पावसाने प्रदीर्घ विश्रांती...
कोल्हापुरात भाज्यांचे दर आठवड्यात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या सप्तहापासून...
सिमला मिरची पाच, टोमॅटो चार रुपये किलोनगर : नगरसह जिल्हाभरातील बाजार समित्यांत टोमॅटोला...
सांगली : उत्पादन खर्च वाढला,...सांगली : आठवडा बाजार सुरू झाले आहेत, पण व्यवहार...
सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या...सातारा : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, सध्या...