परभणी जिल्ह्यात तीन लाख ७२ हजार हेक्टर पिकांना विमा कवच

परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६ लाख ९३ हजार ३५३ ऑनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले आहेत.
Insurance cover for 3 lakh 72 thousand hectares of crops in Parbhani district
Insurance cover for 3 lakh 72 thousand hectares of crops in Parbhani district

परभणी : ‘‘पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ६ लाख ९३ हजार ३५३ ऑनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले आहेत. शेतकऱ्यांनी एकूण ३ लाख ७२ हजार १५ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पीकविमा योजनेअंतर्गंत यंदा सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या सात पिकांचा समावेश होता. जनसुविधा केंद्रांवर ऑनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी शुक्रवार (ता.३१) पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण ६ लाख ९३ हजार ३५३ पीकविमा प्रस्ताव सादर केले. ३ लाख ७२ हजार १५ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांसाठी विमा कवच घेतले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांनी ९२२ पीकविमा प्रस्ताव सादर केले. तर, ७०९.७४ हेक्टवरील पीकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ६ लाख ९२ हजार ४३१ पीकविमा प्रस्ताव सादर केले. तर, ३ लाख ७१ हजार ३९५ हेक्टरवरील पिकांसाठी विमा कवच घेतले आहे. विमा प्रस्ताव सादर केलेल्यांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांपेक्षा बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक विमा प्रस्ताव सादर केले. तर, परभणी तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र विमा सरंक्षित आहे.

बॅकांमध्ये ऑफलाइन पध्दतीने शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्ताव सादर केले आहेत. बॅंकांकडील माहिती संकलित झाल्यानंतर पीकविमा योजनेतील शेतकरी सहभागाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तालुकानिहाय पीकविमा स्थिती

तालुका  पीकविमा प्रस्ताव संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
परभणी ८८७६० ६५३८५
जिंतूर  १२८९७३ ५७६७८
सेलू ७५८२४  ३७७७०
मानवत  ४१४२९  ३१२३८
पाथरी  ५५७०२ ३२१४९
सोनपेठ   ४२८५६  २४६३७
गंगाखेड ९२३७९  ४४६१७
पालम   ८९९७७  ३८४६६
पूर्णा  ७७४५३  ४००२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com