Agriculture news in marathi Insurance covers 21 lakh hectares of crops in Latur, Osmanabad, Nanded, Parbhani, Hingoli | Agrowon

लातूर विभागात विम्याचे २१ लाख हेक्टर पिकांना संरक्षण

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २१ लाख ६ हजार हेक्‍टरवरील खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. 

उस्मानाबाद : लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २१ लाख ६ हजार हेक्‍टरवरील खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा संरक्षण घेण्यासाठी ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी ३९ लाख १९ हजार अर्ज सादर केले. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील १० लाख २९ हजार या सर्वाधिक अर्जासह उस्मानाबादमधील ९ लाख ४८ हजार, नांदेडमधील ९ लाख ४६ हजार, परभणीतील ६ लाख ९४ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ९२ हजार अर्जांचा समावेश होता. या अर्जांद्वारे २१ लाख ६ हजार हेक्टरवरील पिकांना शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. 

विमा संरक्षित क्षेत्रांमध्ये लातूर जिल्ह्यातील ५ लाख ७५ हजार हेक्टरसह, उस्मानाबाद ५ लाख १८ हजार, नांदेड ५ लाख,  परभणी ३ लाख ७२ हजार, तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. विमा संरक्षित क्षेत्रासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४८ कोटी ५६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४१ कोटी ८५ लाख, नांदेड ४४ कोटी २ लाख, परभणी ३२ कोटी ३८ लाख, तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १२ कोटी ४५ लाख रुपये १७९ कोटी २६ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

विम्यापासून ६ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्र दूर 

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार हेक्टरवरील पिके विमा संरक्षनाविना आहेत. जुलै अखेरच्या अहवालानुसार लातूर विभागात २७ लाख ९४ हजार ६७० हेक्टरवर प्रत्यक्षात खरिपाची पेरणी झाली आहे.


इतर बातम्या
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...