नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर पिकांचा विमा

नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर पिकांचा विमा
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर पिकांचा विमा

नांदेड : यंदा जिल्ह्यात ७ लाख ५८ हजार ४०५ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ५ लाख ८५ हजार ९९३ हेक्टरवरील आठ पिकांसाठी शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले. यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण ११ लाख ९८ हजार ५८ पीकविमा प्रस्ताव सादर केले. त्यांनी एकूण ५० कोटी २ लाख ५६ हजार ६३९ रुपये एवढा विमा हप्ता भरला आहे.

२०१९-२० च्या खरीप हंगामातील पिकांचे पेरणी क्षेत्र अंतिम करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ३३ हजार ५०९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ७ लाख ५८ हजार ४०५ हेक्टरवर (९०.९९ टक्के) पेरणी झाली आहे.

यंदा विमा योजनेतंर्गंत बॅंका, जनसुविधा केंद्र, वैयक्तिकरित्या अशा विविध ठिकाणी प्रस्ताव सादर केले. जिल्ह्यातील १९ हजार ८१३ कर्जदार शेतकरी आणि ११ लाख ७८ हजार २४५ बिगर कर्जदार अशा एकूण ११ लाख ९८ लाख ५८ हजार खातेदारांचा त्यात समावेश आहे.

सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, ज्वारी, भात, तीळ ही आठ पिके आहेत. त्यासाठी एकूण ५ लाख ८५ हजार ९९३ हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार २३८ कोटी ८३ लाख ५ हजार ५८९ रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे.

पीकनिहाय विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक क्षेत्र शेतकरी संख्या
सोयाबीन ४१२७७१ ५५९३१३
कापूस ४०६९० १९०८४५
मूग ४५९३९ १९०८४५
उडीद ४३६०२  १६९०२१
तूर १८६५७ ८६६९५
ज्वारी  २२२६४  ७८५३७
भात ३५२ ११२०
तीळ १७१५   ११४७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com