Agriculture news in marathi Insurance office, helpline number not known | Page 2 ||| Agrowon

नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची माहितीच नाही

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकरी सहभागी होतात. मात्र हप्ते भरेपर्यंतच कृषी विभागाकडून आवाहन केले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही.

 नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेतून शेतकरी सहभागी होतात. मात्र हप्ते भरेपर्यंतच कृषी विभागाकडून आवाहन केले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. वेगवेगळ्या कारणाने पीकविम्याचा लाभ नाकारला जातो. त्या बाबत शेतकरी कृषी विभागाकडे तक्रारी करतात, पण कृषी विभाग कंपनीकडे बोट दाखवते आणि कंपनीचे नगरला कार्यालय असल्याचे सांगितले जात असले तरी ते कुठे आहे, हे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही.

बहुतांश वेळा हेल्पलाइन नंबर बंदच असतो. एकंदर पीक विम्याबाबत शेतकरी नगर जिल्ह्यात बेदखल आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र विम्याबाबत कृषी विभागाचे काम चांगले असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. विमा कंपनीचे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय असावे, असा नियम आहे. मात्र अनेक जिल्ह्यांत विमा कंपन्यांची कार्यालये नसल्याची बाब कृषिमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनात आले आहे.

या बाबत नगर जिल्ह्यातील स्थिती पाहिली असता नगर जिल्ह्यात पीकविम्याची भरपाई मिळाली नाही, तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. कृषी विभागाकडे तक्रार केली तर अधिकारी कंपनीकडे बोट दाखवतात. कृषी विभाग कंपनी हिताचे काम करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. खरे तर केवळ हप्ते भरण्यापर्यंत आवाहन केले जाते, नंतर मात्र तक्रारीची दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी तालुका व जिल्हा तक्रार निवारण समित्या आहेत. मात्र तेही तक्रार निकाली काढण्याचा प्रयत्न करत नाहीत.

पीकविम्याबाबत काम चांगले 
नगर जिल्ह्यात पीकविम्याबाबत कृषी विभाग, कंपनीचे काम चांगले आहे. नगर येथे विमा कंपनीचे कार्यालय असून, येथे प्रत्येक तालुक्याला एक विमा कंपनीचा प्रतिनिधी व दोन व्यवस्थापक आहेत. कृषी विभागाकडून तसेच विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारीची दखल घेऊन दावे निकाली काढले जातात. पूर, गारपीट व अन्य कारणाने नुकसान झाले तर त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी गरजेनुसार सर्वेअर वाढवितात, नगर जिल्‍ह्यात विम्याबाबतचे काम चांगले, असा दावा नगरच्या कृषी विभागाने केले आहे.

प्रतिक्रिया

नगर जिल्ह्यात पीकविमा भरेपर्यंत शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांचे विमा दावे फेटाळले जातात. शेतकऱ्यांनी तक्रार केली तर त्याचीही फारशी दखल घेतली जात नाही. कृषी विभागाकडे तक्रार केली तर कंपनीकडे बोट दाखवले जाते. कंपनीचे कार्यालये नगरला असल्याचे सांगितले जात असले तरी ते कुठे आहे हे शेतकऱ्यांना माहिती नाही. एकंदर पीकविम्याबाबत स्थिती गंभीर आहे.

-दादा येणारे, शेतकरी रायतळे, ता. पारनेर जि. नगर


इतर बातम्या
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...