वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा

वाशीमः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरभरून सहभाग घेतला आहे. सहा तालुक्यांच्या या जिल्हयातील सुमारे दोन लाखांवर शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज दिले आहेत.
 Insurance of one lakh 42 thousand hectare area in Washim district
Insurance of one lakh 42 thousand hectare area in Washim district

वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरभरून सहभाग घेतला आहे. सहा तालुक्यांच्या या जिल्हयातील सुमारे दोन लाखांवर शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज दिले आहेत. एक लाख ४२ हजार ८४० हेक्टर क्षेत्राला कवच मिळाले आहे. 

जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, वाशीम, मानोरा या सहाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा काढण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला. प्रामुख्याने कारंजा तालुक्यात सर्वाधिक ४३ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्याचे अर्ज दिले. एक लाख ४२ हजार ८४० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. 

पेरण्या आटोपल्या असून सर्वाधिक जवळपास तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली  आहे. 

याशिवाय तुरीचे ७५ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. जिल्ह्यात मागील खरिपात सोयाबीनची काढणी सुरु झाली, तेव्हा अतिवृष्टी झाली होती. यात हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पिकविमा काढण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले. 

कारंजा तालुक्यात ४३३२३ अर्ज दाखल झाले. ३४ हजार ७४ हेक्टरचा विमा काढण्यात आला. तर, मालेगाव तालुक्यात २९३२७ शेतकऱ्यांनी २१०६१ हेक्टर, मंगरुळपीरमध्ये ३६२४१ शेतकऱ्यांनी २४३५८ हेक्टर, मानोरा तालुक्यातील ३३२७३ शेतकऱ्यांनी २३५६६ हेक्टर, रिसोड तालुक्यात १९५९० शेतकऱ्यांनी १२५८७ हेक्टर, तर वाशीम तालुक्यात ३९१४६ शेतकऱ्यांनी २७ हजार १९१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com