नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींचा विमा

नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम आणि फळपीक विमामंजूर झाला होता. परंतु शेतकऱ्यांना तो मिळालेला नव्हता. यासाठी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे हा पीकविमा मिळणार आहे.
Insurance of Rs. 3.4 crore to over five thousand farmers in Nagar district
Insurance of Rs. 3.4 crore to over five thousand farmers in Nagar district

नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम आणि फळपीक विमामंजूर झाला होता. परंतु शेतकऱ्यांना तो मिळालेला नव्हता. यासाठी जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे हा पीकविमा मिळणार आहे.

जिल्हाभरातील ५ जार १२५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३ कोटी ४१ लाख ७७ हजार ५२ रुपये लवकरच जमा होणार आहेत. 

 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये खरीप व रब्बी हंगाम आणि फळपीक विमा भरला होता. मात्र बॅंक खाते क्रमांकात चुक, सेतू केंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे तसेच नावातील बदलामुळे पीक विमा मंजूर होऊनही जिल्ह्यातील ५ हजार १२५ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळाला नव्हता. त्याबाबत गेल्या एक वर्षांपासून गायकवाड प्रयत्नशील होते.

विमा कंपनीकडे पाठपुरावा करून वरिष्ठ पातळीवर ही बाब लक्षात आणून दिली. अखेर गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश आले. रखडलेला विमा मंजूर झाला. रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. 

विमा रक्कम गेली कंपनीकडे परत

तांत्रिक बाबींमुळे पीकविमा मंजूर होऊनही शेतकऱ्यांचे पैसे कंपनीकडे परत गेले आहेत. त्यामुळे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले. अशा शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेचे तालुका विकास अधिकारी, पारनेर बाजार समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन गायकवाड यांनी केले. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या जिल्हा बॅंकेच्या तालुका विकास अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com