मृग बहरातील फळपिकांसाठी विमा

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे. मृग बहर २०२० मधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू व लिंबू या फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पीक विमा योजना लागू केली आहे.
Insurance schemes for fruit crops
Insurance schemes for fruit crops

विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे. मृग बहर २०२० मधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू व लिंबू या फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पीक विमा योजना लागू केली आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी विमा संरक्षणाची गरज आहे. मृग बहर २०२० मधील संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू व लिंबू या फळपिकांसाठी शासनाने हवामान आधारित पीक विमा योजना लागू केली आहे. कमी पाऊस/जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसूल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे, अशा महसूल मंडळांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येऊन तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू राहणार आहे. त्यासाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे राहील. योजना राबविणाऱ्या कंपन्या

कंपनीचे नाव समाविष्ट जिल्हे
बजाज अलायंज जनरल इन्शुरस कंपनी, पुणे रायगड, बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार, बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई नगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ, सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर

योजनेमध्ये सहभाग

  • योजनेत अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहीत इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
  • चालू वर्षीपासून पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
  • बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
  • शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्यांच्या मर्यादेत राहणार आहे. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून म्हणून देण्यात येतो.
  • फळपिकनिहाय विमा योजना लागू असलेले जिल्हे, प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम रु. आणि ५ टक्के दराने शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता

    फळपिकाचे नाव समाविष्ट जिल्हे प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम (रु.) शेतकऱ्याने भरायचा विमा हप्ता (रु. प्रति हेक्टर)
    संत्रा अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, नागपूर, नगर, हिंगोली, बीड, परभणी, जालना, पुणे ८०००० ४०००
    मोसंबी औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, नगर, बुलडाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, हिंगोली, जळगाव, धुळे, पुणे, यवतमाळ, सोलापूर,उस्मानाबाद,अकोला ८०००० ४०००
    पेरू नगर, बुलडाणा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना , जळगाव, परभणी, सांगली, सोलापूर ६०००० ३०००
    चिकू नगर, ठाणे, पालघर, औरंगाबाद, बीड, पुणे, जळगाव, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, नाशिक, परभणी ६०००० ३०००
    लिंबू बुलढाणा, बीड, सांगली, नगर, जळगाव, परभणी, सोलापूर, पुणे, औरंगाबाद, जालना, धुळे, वाशिम, अकोला, वर्धा, नाशिक, उस्मानाबाद, अमरावती, नांदेड, लातूर ७०००० ३५००
    डाळिंब बुलडाणा, जळगाव, धुळे, सांगली, सोलापूर,नाशिक,जालना, औरंगाबाद, नगर, लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, सातारा, वाशिम, अमरावती, परभणी १३०००० ६५००

    (टीप-  विमा हप्ता वास्तववादी दर ५ टक्यांपेक्षा कमी असल्यास जो कमी दर आहे त्यानुसार शेतकऱ्यास विमा हप्ता भरावा लागेल.) फळपिकनिहाय विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक  

    फळपिकाचे नाव विमा सरंरक्षण प्रकार (हवामान धोके) विमा संरक्षण कालावधी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक
    संत्रा कमी पाऊस १५ जून ते १५ जुलै २० जून २०२०
    पावसाचा खंड १६ जुलै ते १५ ऑगस्ट
    पेरू जास्त पाऊस १५ जून ते ३१ ऑगस्ट
    लिंबू कमी पाऊस १५ जून ते १५ जुलै 
    पावसाचा खंड १६ जुलै ते १५ ऑगस्ट
    मोसंबी कमी पाऊस १ जुलै ते ३१ जुलै ३० जून २०२०
    पावसाचा खंड १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
    चिकू जास्त आर्द्रता व जास्त पाऊस १ जुलै ते ३० सप्टेंबर
    डाळिंब आर्द्रता व जास्त पाऊस १५ जुलै ते १५ डिसेंबर. १४ जुलै २०२०

    विमा मिळण्याचे नियम 

  • या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
  • एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.)
  • अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहरापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब)
  • एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.
  • शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

    संपर्क- विनयकुमार आवटे, ९४०४९ ६३८७० (अधीक्षक कृषी अधिकारी, मनरेगा, पुणे विभाग, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com