नांदेड : विम्याचा ८७ हजार हेक्टरवरील पिकांना आधार

insurance support for 87 thousands hectare crops in Nanded district
insurance support for 87 thousands hectare crops in Nanded district

नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेतंर्गत यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार २०६ शेतकऱ्यांनी ८७ हजार ३२७ हेक्टरवरील पिकांसाठी २१९ कोटी ६५ लाख ४० हजार ५७२ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. विमा कंपनीने कृषी विभागाकडे सादर केलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे.

सिंचनाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गुरुवार (ता. २) पर्यंत जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ८०० हेक्टरवर (१७१.०२ टक्के) रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पेरणी क्षेत्र अजून अंतिम झालेले नाही.

आजवर झालेल्या पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारी २८ हजार ६७१ हेक्टर, गहू २४ हजार ६६७ हेक्टर, हरभरा १ लाख ७३ हजार ७८७ हेक्टर, करडई १ हजार ८८ हेक्टर, मका २ हजार ७३० हेक्टर, सूर्यफूल ४ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

पीकविमा योजनेतंर्गंत जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा  या पिकांचा समावेश होता. पीकविमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता.३१) पर्यंत होती. 

 कृषी विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यातील माहूर आणि उमरी हे दोन तालुके वगळता उर्वरित १४ तालुक्यांतील १७ कर्जदार आणि १ लाख ३७ हजार १८९ बिगर कर्जदार शेतकरी मिळून एकूण १ लाख ३७ हजार २०६ शेतकऱ्यांनी ८७ हजार ३२७ हेक्टरवरील पिकांसाठी २१९ कोटी ६४ लाख ४० हजार ५७२ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. 

पीकनिहाय शेतकरी संख्या, विमा संरक्षित क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक शेतकरी संख्या विमा संरक्षित क्षेत्र
ज्वारी ३७९१३ २०२०२
गहू ९८३१ ५४७३
हरभरा ८९४६२ ६१६५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com