गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी निम्म्याने घटले

गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षीत विमा भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पीकविम्याकडे पाठ फिरविली आहे.
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी निम्म्याने घटले Insured in Gondia district Farmers halved
गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी निम्म्याने घटले Insured in Gondia district Farmers halved

गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षीत विमा भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पीकविम्याकडे पाठ फिरविली आहे. गेल्या हंगामात ५६,६४० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असताना यंदा विमा काढणाऱ्यांची संख्या अवघी १२,०६८ इतकीच आहे.  जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार खातेधारक आहेत. यापैकी मागील वर्षी ५६,६४० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. विमा हप्यापोटी शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकूण १६ कोटी रुपयांचा भरणा केला होता. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने केवळ ४,३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवीत अवघी २ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच यंदा पीकविमा काढण्याला मुदतवाढ देण्यात आली असतानाही शेतकऱ्यांचा या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. या वर्षी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या १२,०६८ वर आली आहे. याची टक्‍केवारी अवघी २१.३० असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्र २ लाख १० हजार २४२ हेक्‍टर आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ८१ हजार हेक्‍टर धान लागवड होते. तूर ४ हजार, ऊस १५ तर इतर पिके १० हजार हेक्‍टवर राहतात. तालुकानिहाय  विमाधारक शेतकरी     

  • आमगाव    ६३३ 
  • अर्जुनी मोरगाव    ६३३ 
  • देवरी    ९३१ 
  • गोंदिया    १५६३ 
  • गोरेगाव    १४३७ 
  • सडक अर्जुंनी    २८२१ 
  • सालेकसा    ७४८ 
  • तिरोडा    ३२७२
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com