Agriculture news in marathi Insured in Gondia district Farmers halved | Agrowon

गोंदिया जिल्ह्यात विमाधारक शेतकरी निम्म्याने घटले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 ऑगस्ट 2021

गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षीत विमा भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा पीकविम्याकडे पाठ फिरविली आहे.

गोंदिया : गेल्या वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले होते. मात्र त्यानंतरही अपेक्षीत विमा भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात पीकविम्याकडे पाठ फिरविली आहे. गेल्या हंगामात ५६,६४० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असताना यंदा विमा काढणाऱ्यांची संख्या अवघी १२,०६८ इतकीच आहे. 

जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार खातेधारक आहेत. यापैकी मागील वर्षी ५६,६४० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. विमा हप्यापोटी शेतकरी, केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकूण १६ कोटी रुपयांचा भरणा केला होता. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र विमा कंपनीने केवळ ४,३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवीत अवघी २ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली.

या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच यंदा पीकविमा काढण्याला मुदतवाढ देण्यात आली असतानाही शेतकऱ्यांचा या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. या वर्षी विमाधारक शेतकऱ्यांची संख्या १२,०६८ वर आली आहे. याची टक्‍केवारी अवघी २१.३० असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्र २ लाख १० हजार २४२ हेक्‍टर आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ८१ हजार हेक्‍टर धान लागवड होते. तूर ४ हजार, ऊस १५ तर इतर पिके १० हजार हेक्‍टवर राहतात.

तालुकानिहाय विमाधारक शेतकरी     

  • आमगाव    ६३३ 
  • अर्जुनी मोरगाव    ६३३ 
  • देवरी    ९३१ 
  • गोंदिया    १५६३ 
  • गोरेगाव    १४३७ 
  • सडक अर्जुंनी    २८२१ 
  • सालेकसा    ७४८ 
  • तिरोडा    ३२७२

इतर बातम्या
‘अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना  हेक्टरी...परभणी : अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या आहेत....
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे...
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
पुरंदरमध्ये लवकरच प्रॉपर्टी कार्ड : ...गराडे, जि. पुणे : स्वामित्व योजना...
आमच्या गावाला ग्रामपंचायत द्या...गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी व मुल्लुरचक या...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
पुणे जिल्ह्यात तुरळक  ठिकाणी हलक्या...पुणे : दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण...
एकरकमी एफआरपीसाठी  भारतीय किसान संघाचे...पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर...
नगरला कांदा दरात  चढ-उतार सुरूच नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी  कुरुंदवाडमध्ये...कोल्हापूर : महापूर ओसरून दीड महिना झाला असून,...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...
अखेर ‘चोसाका’ला मिळाली नवसंजीवनीचोपडा, जि. जळगाव  : ‘‘चोपडा शेतकरी सहकारी...
पूर्व विदर्भात पावसामुळे हाहाकार नागपूर : पूर्व विदर्भातील भंडारा आणि नागपूर...
पोषक आहाराबद्दल जागरूकता महत्त्वाची :...सोलापूर ः ‘‘आपल्या सर्वांसाठी पोषक आहार आवश्यक...