नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
ताज्या घडामोडी
`भोकरमध्ये एकात्मिक व्यवस्थापनामुळे तुरीवरील मर नियंत्रणात`
नांदेड : भोकर तालुक्यातील नारवट येथील शेतकरी लक्ष्मीकांत देशपांडे यांनी तूर पिकास एकात्मिक पद्धतीने अन्य द्रव्य व एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन केले आहे. यामुळे त्यांच्या तुरीवर अत्यंत कमी प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड : भोकर तालुक्यातील नारवट येथील शेतकरी लक्ष्मीकांत देशपांडे यांनी तूर पिकास एकात्मिक पद्धतीने अन्य द्रव्य व एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन केले आहे. यामुळे त्यांच्या तुरीवर अत्यंत कमी प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन केल्यामुळे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त
केली.
नारवट येथील देशपांडे यांनी दहा एकरमध्ये ‘बीएसएमआर -७३६’ या तूर वाणाची टोकण पद्धतीने १० बाय दीड फूट अंतरावर लागवड केली. पिकास एकात्मिक पद्धतीने अन्य द्रव्य व एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन केले. यामुळे इतरांच्या तुलनेत तुरीवर कमी प्रमाणात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून आला. एकरी उत्पादन आठ ते दहा क्विंटल येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोमवारी (ता. ११) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी.बी देवसरकर, कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी देशपांडे यांच्या तूर पिकाची पाहणी केली. त्यांनी उभ्या पिकातून चांगल्या झाडांची निवड कशी करावी, घरच्या घरी शुध्द बियाणे तयार करून इतर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
चांगल्या झाडांची निवड कशी करावी हे प्रत्यक्षात करून दाखविले. यानंतर त्यांनी रायखोड येथे नार्लेवाड यांच्या नावीन्यपूर्ण बटाटा शेतीस भेट दिली. भगवान कदम यांच्या पेरू व पपई बागेस भेट देऊन अनद्रव्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. गिते, मंडळ कृषी अधिकारी रामहरी मिसाळ, तालुका तंत्र व्यवस्थापक बोईनवाड, कृषी सहायक विशाल बोथिंगे, शंतनू सितावर आदी उपस्थित होते.
- 1 of 1028
- ››