भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संचालकांनी ''कॅच द रेन'' या भूजल योजनेच्या जनजागृती अभियानाच
तेलबिया पिके
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
तीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१) किंवा तीळ + कापूस (३:१) असे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते. तीळ पिकाभोवती मका किंवा ज्वारी किंवा बाजरी या संरक्षक पिकाच्या चार ओळींची लागवड करावी.
तीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१) किंवा तीळ + कापूस (३:१) असे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते. तीळ पिकाभोवती मका किंवा ज्वारी किंवा बाजरी या संरक्षक पिकाच्या चार ओळींची लागवड करावी. पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर आवश्यकतेप्रमाणे ओलित करावे.
सुमारे ३ हजार वर्षांपासून तीळ पीक लागवडीखाली आहे. तिळामध्ये ४० ते ५० टक्के ओलेईक (Oleic), ३५ ते ४५ टक्के लिनोलेईक (Linoleic) स्निग्धाम्ल व बियांमध्ये तेलाचे प्रमाण अधिक. या पिकाखालील क्षेत्र, निर्यात व उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक असून, निर्यात करण्यात जपान देश प्रथम क्रमांकावर आहे.
- हे दुष्काळ सहन करणारे, आपत्कालीन, आंतरपीक, मिश्रपीक योग्य पीक.
- खरीप, अर्ध रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेणे शक्य.
- कमी कालावधीचे (८० ते १०० दिवसांचे) पीक.
- पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत तिळाची लागवड शक्य.
- सतत पडणारा पाऊस व पाणी साचून राहणाऱ्या जमिनी या पिकासाठी पोषक नाहीत.
- तीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१) किंवा तीळ + कापूस (३:१) असे आंतरपीक घेणे फायदेशीर ठरते.
- तीळ पिकाभोवती मका किंवा ज्वारी किंवा बाजरी या संरक्षक पिकाच्या चार ओळींची लागवड करावी.
- पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर आवश्यकतेप्रमाणे ओलित करावे.
- पीक फुलोरा अवस्थेत असताना व बोंड्या भरत असताना पिकावर ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. आवश्यकतेनुसार संरक्षित ओलिताची सोय करावी.
- केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
- उगवणीनंतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत किमान ३० ते ३५ दिवस शेत तणविरहित ठेवावे.
- कीडग्रस्त झाडे, झाडांचे भाग तोडून किंवा अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- ८० किलो नीम पेंड प्रति एकरी जमिनीतून द्यावी.
एकात्मिक कीड व्यवस्थापन
गादमाशी
प्रौढ मादी माशी फुलाच्या आत अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडून फुलातील स्त्री-पुंकेसर खाऊन फस्त करते. परिणामी, बोंडाची निर्मिती न होता त्या बोंडाचे रूपांतर गाठीमध्ये होते. अशा प्रादुर्भावग्रस्त बोंडामध्ये बी तयार होत नाहीत.
तिळावरील बहिरी ससाणा पतंग (Hawk Moth)
या किडीची अळी खादाड असून अधाशीपणे पानांवर उपजीविका करते. त्यामुळे झाडावरील पाने गळतात.
एकात्मिक व्यवस्थापन
- तुडतुडे, गादमाशी व इतर रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता एकरी २० ते २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.
- प्रति एकरी २० पक्षी थांबे उभारावेत. प्रकाश सापळे दोन प्रति एकर लावावेत.
- उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणी. १५ दिवसाच्या अंतराने आवश्यकतेनुसार पुढील फवारणी घ्यावी.
संपर्क ः डॉ. प्रमोद नागोराव मगर, ७७५७०८१८८५
(विषय विशेषज्ञ-कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
- 1 of 4
- ››