agriculture news in marathi Integrated management of sucking pest on cotton | Agrowon

कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. संजोग बोकन
रविवार, 6 सप्टेंबर 2020

किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी सुरवातीपासूनच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असल्याने किडींचे नैसर्गिक शत्रूही कमी होतात. तसेच किडीमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका राहतो. 

सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकरी सुरवातीपासूनच रासायनिक कीटकनाशकाचा वापर करत असल्याने किडींचे नैसर्गिक शत्रूही कमी होतात. तसेच किडीमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका राहतो. शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे.

कपाशीवरील रस शोषक किडी 
मावा 

या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत दिसून येतो. ही कीड पिवळसर ते गडद हिरवी असते. मागच्या बाजूस शिंगासारखी दोन टोके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. मावा शरीरातून चिकट द्रव बाहेर टाकतो. त्यामुळे पानावरील भाग चिकट बनतो.

तुडतुडे
या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होऊन सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राहतो. पाचरीच्या आकाराचे व फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. ते नेहमी तिरके चालतात. प्रौढ व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात त्यामुळे पाने कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाचे होतात.

फुलकिडे
ही कीड ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येते. ही कीड अतिशय लहान फिक्कट पिवळसर असून त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ दिसतात. प्रौढ फुलकिडे कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भाग प्रथम पांढुरका व नंतर तपकिरी होतो. दोन पावसात खंड पडल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढतो

पांढरी माशी
या किडीचा प्रादुर्भाव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होतो. प्रौढ माशीचे पंख पांढरे असून शरीरावर पिवळसर झाक असते. डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात. पानाच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात अशी पाने कोमजतात व पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते.

एकात्मिक व्यवस्थापन
मशागतीय पद्धती

  • माती परीक्षणानुसार नत्र खताचा वापर करावा. रस शोषक किडी व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी अतिरीक्त नत्र खताचा वापर टाळावा.
  • कपाशीमध्ये चवळी, मुग, उडीद यांचे आंतरपिक असल्यास मित्रकीटकांचे संवर्धन होते.

यांत्रिक पद्धती 
पांढरी माशीला  आकर्षित करण्यासाठी पिकापेक्षा जास्त १५ सेंमी उंचीवर व पिकाच्या ओळीपासून २० सेंमी अंतरावर १० ते १२ पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टरी शेतामध्ये लावावेत.

जैविक पद्धती 

  • ढालकिडा या मित्र कीटकांचे प्रौढ व त्यांच्या अळ्या मावा कीडीसोबत पुरेशा प्रमाणात दिसून आल्यास रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी.
  • ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
  • पांढरी माशी करिता व्हर्टीसीलीयम लेकॅनी (१.१५ टक्के डब्ल्यू.पी.) या बुरशीजन्य किटकनाशक ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी
मावा-
 १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा १० मावा प्रति पान
तुडतुडे- २ ते ३ पिल्ले प्रति पान
फुलकिडे- १० फुलकिडे प्रति पान
पांढरी माशी- ८ ते १० प्रौढ माशा प्रति पान

रासायनिक पध्दत ः फवारणी प्रति लिटर पाणी
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच खालील रासायनिक किटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.

तुडतूडे, मावा, फुलकिडे, पांढरी माशी
फ्लोनीकॅमीड (५० डब्लूजी) ०.३ ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस (५० इसी) २ मिली किंवा फिप्रोनील (५ एससी) ३ मिली किंवा क्लोरपायरीफॉस (५० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (५ टक्के इसी) (संयुक्त कीटकनाशक) २ मिली

जर फूलकिडींचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास,
स्पायनोटोरम (११.७ एस.सी.) ०.८४ मिली किंवा थायामिथोक्झाम (१२.६) अधिक लॅबडा सायहॅलोथ्रीन (९.५ झेडसी) (संयुक्त किटकनाशक) ०.४ मिली

जर पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास,
बुप्रोफेजीन (२५ एससी) २ मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन (१० इसी) २ मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपॅथ्रीन (१५ टक्के) (संयुक्त किटकनाशक) १ मिली.

संपर्क- डॉ. पुरुषोत्तम झंवर, ७५८८१५१२४४
डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२०००
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.)


इतर नगदी पिके
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...