Agriculture news in Marathi Integrated Pest Management Controls Military Larvae: Dowley | Agrowon

एकात्मिक कीड व्यवस्थापनाने लष्करी अळीवर नियंत्रण ः डवले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

नाशिक : सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच दिसणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरुवातीला रासायनिक फवारण्या न करता नीम अर्क सारख्या फवारण्या कराव्यात. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर शेतकऱ्यांनी प्रभावीपणे अवलंब करावा. यातून प्रादुर्भाव नियंत्रित होईल आणि खर्चही वाचेल, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

नाशिक : सध्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे प्राथमिक अवस्थेतच दिसणाऱ्या अमेरिकन लष्करी अळीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरुवातीला रासायनिक फवारण्या न करता नीम अर्क सारख्या फवारण्या कराव्यात. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर शेतकऱ्यांनी प्रभावीपणे अवलंब करावा. यातून प्रादुर्भाव नियंत्रित होईल आणि खर्चही वाचेल, असे आवाहन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले.

राज्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन १ जुलैपासून कृषी संजीवनी सप्ताह सुरू आहे. त्यानुसार, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनीही दौरा सुरू केला आहे. गुरुवारी (ता. २) निफाड व चांदवड तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत त्यांनी विविध उपक्रमाची माहिती घेतली. दौऱ्यात मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणासाठी कामगंध सापळे, पक्षी थांबे, निंबोळी अर्काची फवारणी या विषयी सविस्तर चर्चा करत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

निफाड तालुक्यातील उगाव येथे श्री. डवले यांनी श्री सेंद्रिय फळे व भाजीपाला उत्पादक गटास भेट दिली. गटामार्फत राबवण्यात येणाऱ्या सेंद्रिय शेती निविष्ठा व सेंद्रिय शेतीमाल याविषयी माहिती घेतली. ‘सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि गरज’ याविषयी शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

या भेट दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक संजीव पडवळ, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, आत्मा प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, निफाड तालुका कृषी अधिकारी बी. जी. पाटील, पिंपळगाव बसवंत मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील, कृषी पर्यवेक्षक श्री. गायमुखे, कृषी सहायक श्री. धर्माधिकारी या वेळी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...