आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही : राकेश टिकैत

शेतकरी एका पिकाचे बलिदान देण्यास तयार आहेत, परंतु आंदोलन स्थळ सोडणार नाहीत आणि सुरू असलेले आंदोलनही कोणत्याही किमतीवर कमकुवत होऊ देणार नाही, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.
आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही : राकेश टिकैत Intensity of agitation will not be reduced: Rakesh Tikait
आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही : राकेश टिकैत Intensity of agitation will not be reduced: Rakesh Tikait

गाझियाबाद, उत्तर प्रदेश : शेतकरी एका पिकाचे बलिदान देण्यास तयार आहेत, परंतु आंदोलन स्थळ सोडणार नाहीत आणि सुरू असलेले आंदोलनही कोणत्याही किमतीवर कमकुवत होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी (ता. १९) दिला आहे. 

टिकैत म्हणाले, ‘‘जर सरकार जागे होत नसेल तर मी काहीही करू शकत नाही. आम्ही गेली ७० वर्षे नुकसानीचीच शेती करीत आहोत. त्यामुळे आणखी एका पिकाचा बळी द्यावा लागला तर, त्यासाठी तयार आहेत.

पीक कापणीसाठी अधिक कामगारांची मदत घ्यावी लागली तरी चालेल. पण आंदोलन स्थळ सोडणार नाही आणि शेतीतून आलेले पीकही घरीच ठेवू. पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही.’’ 

वीज दिल्ली सरकारकडून घेऊ  ‘‘उन्हाळ्यात आंदोलन सुरू राहिले तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पंखे आणि कूलर बसवू. आम्ही यूपी सरकारकडून वीज जोडणीची मागणी करू, त्यांनी वीज न दिल्यास दिल्ली सरकारकडून वीज जोडणी घेऊ आणि त्यांनीही नकार दिल्यास आम्ही जनरेटरची व्यवस्था करू. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊ,’’ असेही टिकैत म्हणाले. 

पश्‍चिम बंगालमध्ये आंदोलन करण्याचा इशारा  हिसार येथे गुरुवारी (ता. १९) एका महापंचायतीत बोलताना टिकैत म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास पश्चिम बंगालमध्येही आंदोलन करू.  शेतमालांच्या किंमती वाढविल्या जात नाहीत, परंतु इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्राने परिस्थिती आणखी खराब केली तर आम्ही आमचे ट्रॅक्टर पश्चिम बंगालमध्येही नेऊ. तेथेही शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळत नाही.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com