Agriculture news in marathi Intensity of agitation will not be reduced: Rakesh Tikait | Page 2 ||| Agrowon

आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही : राकेश टिकैत

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

शेतकरी एका पिकाचे बलिदान देण्यास तयार आहेत, परंतु आंदोलन स्थळ सोडणार नाहीत आणि सुरू असलेले आंदोलनही कोणत्याही किमतीवर कमकुवत होऊ देणार नाही, असा इशारा  राकेश टिकैत यांनी  दिला आहे. 

गाझियाबाद, उत्तर प्रदेश : शेतकरी एका पिकाचे बलिदान देण्यास तयार आहेत, परंतु आंदोलन स्थळ सोडणार नाहीत आणि सुरू असलेले आंदोलनही कोणत्याही किमतीवर कमकुवत होऊ देणार नाही, असा इशारा भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी शुक्रवारी (ता. १९) दिला आहे. 

टिकैत म्हणाले, ‘‘जर सरकार जागे होत नसेल तर मी काहीही करू शकत नाही. आम्ही गेली ७० वर्षे नुकसानीचीच शेती करीत आहोत. त्यामुळे आणखी एका पिकाचा बळी द्यावा लागला तर, त्यासाठी तयार आहेत.

पीक कापणीसाठी अधिक कामगारांची मदत घ्यावी लागली तरी चालेल. पण आंदोलन स्थळ सोडणार नाही आणि शेतीतून आलेले पीकही घरीच ठेवू. पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही.’’ 

वीज दिल्ली सरकारकडून घेऊ 
‘‘उन्हाळ्यात आंदोलन सुरू राहिले तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पंखे आणि कूलर बसवू. आम्ही यूपी सरकारकडून वीज जोडणीची मागणी करू, त्यांनी वीज न दिल्यास दिल्ली सरकारकडून वीज जोडणी घेऊ आणि त्यांनीही नकार दिल्यास आम्ही जनरेटरची व्यवस्था करू. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे आंदोलनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊ,’’ असेही टिकैत म्हणाले. 

पश्‍चिम बंगालमध्ये आंदोलन करण्याचा इशारा 
हिसार येथे गुरुवारी (ता. १९) एका महापंचायतीत बोलताना टिकैत म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास पश्चिम बंगालमध्येही आंदोलन करू. 
शेतमालांच्या किंमती वाढविल्या जात नाहीत, परंतु इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्राने परिस्थिती आणखी खराब केली तर आम्ही आमचे ट्रॅक्टर पश्चिम बंगालमध्येही नेऊ. तेथेही शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळत नाही.’’


इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...