agriculture news in marathi Intensity of corona continues in france, 987 dies in a day | Agrowon

फ्रान्समध्ये कोरोनाची तीव्रता कायम; चोवीस तासात ९८७ बळी

वृत्तसेवा
रविवार, 12 एप्रिल 2020

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोना संसर्गामुळे शुक्रवारी चोवीस तासात ९८७ जणांचे बळी गेले आहेत. आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. ९८७ पैकी ५५४ बळी रुग्णालयात तर ४३३ जणांचे बळी नर्सिंग होममध्ये गेले.

पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोना संसर्गामुळे शुक्रवारी चोवीस तासात ९८७ जणांचे बळी गेले आहेत. आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. ९८७ पैकी ५५४ बळी रुग्णालयात तर ४३३ जणांचे बळी नर्सिंग होममध्ये गेले. त्यामुळे आतापर्यंत फ्रान्समध्ये मृतांची संख्या १३,१९७ वर पोचली आहे. दहा वर्षाच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. मात्र त्याला अनेक प्रकारचे आजार होते, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.

फ्रान्समध्ये १७ मार्चपासून लॉकडाउन असून तेथे सध्या अत्यावश्‍यक सेवा सुरू आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यानूएअल मॅक्रॉन यांनी याही आठवड्यात देशाला उद्देशून मार्गदर्शन केले. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर हे त्यांचे तिसरे भाषण होते. फ्रान्सची स्थिती अजूनही आटोक्यात आली नसल्याने लॉकडाउनचा कालावधी वाढविला जावू शकतो. सध्या फ्रान्समध्ये १५ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. यादम्यान अध्यक्ष मॅक्रॉन यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती आणि संघटनेच्या नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरसिंगने चर्चा केली. तसेच यापुढील स्थितीचा निपटारा करण्याबाबत चर्चा केली. पॅरिसमधील रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता फ्रान्सने शहरातील आणखी ४५ कोरोनाबाधित रुग्णांना रेल्वेने अन्य शहरात स्थानांतरित केले. याअगोदर एक एप्रिलपासून दोनशेहून अधिक रुग्णांना रस्ते, रेल्वे आणि हवाईमार्गाने पॅरिस प्रांतातून हलविले आहे. तसेच फ्रान्सची मालवाहू हवाई कंपनी चार्ल्स डे गॉलच्या ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...