agriculture news in marathi The intensity of return rain has decreased in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

पुणे : जिल्ह्यात गुरुवारपासून (ता.१५) पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारीही (ता.१७) पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली होती.

पुणे : जिल्ह्यात गुरुवारपासून (ता.१५) पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारीही (ता.१७) पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली होती. काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. तरीही पावसाच्या कमी झालेल्या सरींमुळे शेतकरीही शेतीकामांसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र होते.

सध्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत असल्या तरी बुधवारी झालेल्या पावसाने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. अतिवृष्टीने एकाच दिवसात शेतकऱ्यांकडे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. शेतकऱ्यांना वर्षभर विकत धान्य घेण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सोयाबीन, भात, कांदा, बाजरी, भुईमूग, ज्वारी, फुलपीके, चारा पिके, मका, तृणधान्ये, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

इंदापूर, बारामती, दौंड, हवेली, पुरंदर, शिरूर तालुक्यात अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती. त्यामुळे शेतकरी चांगलाच कोलमडला असून अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी बोलून दाखवली.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे सर्वाधिक ३०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. शिवणे येथे १२.८ मिलिमीटर, तर तळेगाव येथे ११.३ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर, थेरगाव, माले, पिरंगुट, जुन्नर, नारायणगाव, आपटाळे, चाकण, घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, टाकळी, न्हावरा, मलठण, कोरेगाव, पाबळ, माळेगाव, लोणी, सुपा, राहू, रावणगाव येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणांतून विसर्ग सुरूच

धरणक्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने अजूनही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. मात्र, विसर्ग कमी असल्याने जिल्ह्यातील मुठा, पवना, मुळा, आरळा, भीमा, इंद्रायणी, नीरा, कऱ्हा, मीना, हंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा धोका काही प्रमाणात टळला होता.


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...