Agriculture news in Marathi Inter-crop registration in e-crop survey app 'lost' | Agrowon

ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘खो’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतातील मुख्य पिकात असलेल्या आंतरपिकांची नोंद अ‍ॅपमध्ये होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. 

पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी कार्यक्रमात शेतातील मुख्य पिकात असलेल्या आंतरपिकांची नोंद अ‍ॅपमध्ये होत नसल्याने शेतकरी त्रासले आहेत. 

पथ्रोट परिसरात ८० टक्के क्षेत्रफळावर संत्रा बागा आहेत. त्यापैकी पन्नास टक्के शेतीमध्ये सोयाबीन, तूर, उडदसारखी शासन खरेदीत अग्रेसर असलेल्या पिकांची आंतरपीक म्हणून शेतकरी सदरचे पीक घेतात. मुख्य पिकासोबत असलेल्या अशा सर्व आंतरपिकांची ते शासनदरबारी खरेदीचा व्यवहार करता यावा, तसेच नुकसान झाल्यास भरपाई मिळावी म्हणून तलाठ्यांमार्फत आपल्या सातबारावर नोंद घेतात. परंतु आता २०२०-२१ करिता खरीप हंगामातील पीकपाहणी पेरा हा १५ सप्टेंबर २०२१ आपण स्वतः मोबाईलच्या साह्याने नोंदवायचा आहे. त्यामुळे शासन आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतातील पिकांची नोंद आपणास स्वतः शेतात जाऊन करायची आहे. तसे न केल्यास आपल्या सातबारा उताऱ्यातील पीकपेरा हा कोरा राहील. त्यामुळे आपणास कोणतीही शासकीय मदत बाजार समितीत, पीकविमा, पीककर्ज व अनुदान प्राप्त होणार नाही व लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

त्या अनुषंगाने प्रत्येक शेतकऱ्याने आपले मुख्य पीक व आंतरपीक ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये नोंद करणे सुरू केले आहे. परंतु मुख्य पिकातील आंतरपिकांची नोंद ही सदरच्या अ‍ॅपमध्ये होत नसल्याने त्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. मात्र जोपर्यंत त्यांच्या आंतरपिकाची नोंद अ‍ॅपमध्ये होत नाही तोपर्यंत ती नोंद सातबारा पीकपेऱ्यामध्ये घेण्यास तलाठ्यांनीसुद्धा असमर्थता दाखविली असल्याने शेतकरी खूपच वैतागले आहेत. याबाबत तलाठीसुद्धा निरुत्तर झाले आहेत. 

मिश्र पिकांमध्ये आंतरपिकाची नोंद होते
ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये मिश्र पिकांमध्ये आंतरपिकाची नोंद होते. त्या अ‍ॅपमध्ये आंतरपिकाची नोंद करून घ्यावी, असे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सुचविले आहे.

ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये आंतरपिकाची नोंद करण्यासाठी सर्व पर्याय निवडले तरी नोंद होत नाही. तसेच सदरचे अ‍ॅपही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे आमची खूपच पंचाईत झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन आम्हाला प्रात्यक्षिक द्यावे. 
- पवन जगनवार, शेतकरी, पथ्रोट


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...