agriculture news in marathi intercropping systems for Rabi season crop | Agrowon

रब्बी हंगामातील लागवडीचे नियोजन

डॉ. भगवान आसेवार
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक आणि दुबार पीक पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. रब्बी ज्वारी+हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या आंतर पीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत.

रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक आणि दुबार पीक पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी+हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या आंतर पीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत.

रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक आणि दुबार पीक पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामात सलग पिकाच्याऐवजी आंतरपीक पध्दतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येते तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी+हरभरा (६:३) आणि रब्बी ज्वारी + करडई (६:३) या आंतर पीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत.

आंतरपीक पद्धती  
रब्बी ज्वारी+करडई
 
ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी किंवा करडई सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. ही आंतरपीक पध्दत ६:३ या ओळीच्या प्रमाणात घेण्यात यावी.

करडई  + हरभरा 
मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. ४:२ किंवा ६:३ ओळीच्या प्रमाणातही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.

दुबार पीक पद्धती

  • ज्या जमिनीची खोली एक मीटर अथवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा जमिनीवर दुबार पीक पध्दत यशस्वीरीत्या घेता येते. 
  • मूग / उडीद, सोयाबीन (खरीप) ः  रब्बी ज्वारी / हरभरा / करडई
  • खरीप संकरित ज्वारी ः  करडई / हरभरा / जवस

योग्य जातींची ‍निवड  

  • रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील तफावतीला कमी बळी पडणाऱ्या जातींची निवड करावी.
  • कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. 

शिफारशीत जाती  
रब्बी ज्वारी  

मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही-१४११), स्वाती (एसपीव्ही-५०४), परभणी ज्योती

सूर्यफूल 
मॉडर्न, एससीएच-३५, ई.सी.६८४१४, एलएसएफएच-१७१      

करडई
भीमा, शारदा, तारा, एन-६२-८,अनेगिरी, नारी -६, पीबीएनएस-१२, पीबीएनएस-४०, पीबीएनएस-८६     

हरभरा  
विजय, बीडीएन-९-३, विशाल, जी-१२, आयसीसीव्ही-२
       
जवस
एनआय-२०७, एस-३६, एलएसएल-९३  

जमिनीच्या प्रकारानुसार पिके आणि पीक पद्धती
 

जमीन खोली (सें.मी.)  उपलब्ध ओलावा (‍मि.मि.) घ्यावयाची पिके,पीक पद्धती
मध्यम २२.५-४५ ६०-६५  सूर्यफूल, करडई
मध्यम खोल १) ५४-६० ८०-९०  रब्बी ज्वारी,करडई
२) ६०-९०  १४०-१५० रब्बी ज्वारी + करडई (६:३) आंतरपीक
रब्बी ज्वारी,करडई, हरभरा
रब्बी ज्वारी + करडई (६:३)
करडई + हरभरा : (६:३) 
खोल ९० पेक्षा जास्त  १६० पेक्षा जास्त रब्बी ज्वारी,करडई,  हरभरा ही सलग पिके तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन नंतर रब्बी ज्वारी, करडई, हरभरा लागवड करावी.

पेरणीचे नियोजन 

  • योग्य वेळी पेरणी केल्यामुळे उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्ये  आणि इतर साधनांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन पिकाची जोमदार वाढ होते. अधिक उत्पादन मिळते. 
  • योग्य वेळी पेरणी केलेल्या पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • रब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी.करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. परंतु या कालावधीत पाऊस एकसारखा सुरु असेल आणि जमिनीमध्ये पेरणी योग्य परिस्थिती नसेल,तर अशा परिस्थीतीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी३०ऑक्टोबरपर्यंत करता येईल.
  • रब्बी हंगामातील पीक नियोजन करताना, आपत्कालीन पीक नियोजनाप्रमाणे शिफारस करण्यात आलेल्या पीक पध्दतीचा अवलंब करावा. 

 

पीक पेरणी योग्य कालावधी
रब्बी ज्वारी ३०सप्टेंबर ते २०ऑक्टोबर
सूर्यफूल २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
करडई  ३० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
हरभरा ३० सप्टेंबर ते २० ऑक्टोबर
जवस २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
 

संपर्क- डॉ. भगवान आसेवार,  ९४२००३७३५९
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...