Agriculture news in marathi Intercropping of tur in soybeans | Agrowon

सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

नांदेड : ‘‘कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यंदा सोयाबीन - तूर अशा पद्धतीने सुमारे ३२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर आंतर पध्दतीचा अंगीकार शेतकऱ्यांनी केला आहे.

नांदेड : ‘‘कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन यंदा सोयाबीन - तूर, तुरीच्या ओळीमध्ये एक ओळ उडीद किंवा मूग अशा पद्धतीने सुमारे ३२ हजार हेक्‍टर क्षेत्रावर आंतर पध्दतीचा अंगीकार शेतकऱ्यांनी केला आहे,’’ अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.

कंधार तालुका बहुतांश कोरडवाहू क्षेत्राचा आहे. बारमाही सिंचनाची सुविधा अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांसाठी खरिपातील हंगाम अतिशय महत्वाचा असतो. यंदा तालुक्यात गुरुवार (ता.३०) अखेर सरासरी ३१६ मि.मी पाऊस झाला. तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ६८ हजार ३०३ हेक्टर आहे.

यंदा त्यापैकी २३ हजार ७१४ हेक्टरवर सोयाबीन, १ हजार ८६६ हेक्टरवर मूग, १ हजार ३५० हेक्टर उडीद, ५ हजार ५७५ हेक्टरवर तूर या पिकांची पेरणी झाली आहे. २६ हजार २४३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत यावर्षी सुमारे ७० हेक्‍टर क्षेत्रावर आंबा, चिकू, लिंबू , डाळिंब, मोसंबी, सिताफळ या फळपिकांची लागवड झाली आहे.

कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रॉपसॅपअंतर्गत तालुक्यातील कापूस व सोयाबीन पिकांची गावे निवडली आहेत. प्रत्येक गावांत दोन प्लॉट निवडून या प्लॉटची निरीक्षणे क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक आठवड्याला घेतली जात आहेत. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या जात आहेत, असे देशमुख यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...