agriculture news in Marathi, internal fight in BJP, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

जळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व रावेर मतदारसंघांत उमेदवार कोण असतील, या संदर्भात संकेत मिळू लागले असून, जळगावमधून पुन्हा एकदा ए. टी. पाटील व रावेरातून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम राहणार आहे. यातच धुळे मतदारसंघात भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात उघड काम करण्याचा पवित्रा घेतला आहे. 

जळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व रावेर मतदारसंघांत उमेदवार कोण असतील, या संदर्भात संकेत मिळू लागले असून, जळगावमधून पुन्हा एकदा ए. टी. पाटील व रावेरातून रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम राहणार आहे. यातच धुळे मतदारसंघात भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात उघड काम करण्याचा पवित्रा घेतला आहे. 

जळगाव क्षेत्राचे खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच गोत्यात आली होती. परंतु उमेदवारीसंबंधी ते दिल्लीत ठाण मांडून होते. मोठे मताधिक्‍य मिळविणारे खासदार म्हणून पाटील यांनी खानदेशात विक्रम केला आहे. त्यांना पक्षाकडून डावलले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे रावेरातही विद्यमान खासदार रक्षा खडसे याच उमेदवार असतील, की नाही हा प्रश्‍न आहे.

कारण माजी खासदार तथा रावेरचे आमदार हरिभाऊ जावळेंसह आता भुसावळमधील अजय भोळे यांचे नावही या मतदारसंघासाठी मध्येच पुढे केले जाते. परंतु खासदार खडसे यांनी आपल्या मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. नेतृत्वाकडून खडसे यांच्या उमेदवारीबाबत हिरवा कंदील मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
रावेर मतदारसंघ कॉँग्रेसला रावेर मतदारसंघ आघाडीमध्ये कॉँग्रेसला जाईल, असे निश्‍चित मानले जात असून, या मतदारसंघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांची उमेदवारीदेखील निश्‍चित झाल्याचे सांगण्यात आले.

केंद्रात मंत्रिपद देणारा जळगाव मतदारसंघ 
जळगाव लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा व चर्चेत राहिला आहे. भाजपचे डॉ. गुणवंत सरोदे, एम. के. पाटील हे सलग दोनदा निवडून आले. तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या मतदारसंघातून कॉँग्रेसचे विजय नवल पाटील, भाजपचे एम. के. पाटील हे केंद्रात मंत्रीही झाले आहे. तिसऱ्यांदा मात्र या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मागील सहा पंचवार्षिकमध्ये मिळालेली नसल्याचे जाणकार सांगतात.  धुळे मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. भामरे यांना पराभूत करण्यासाठी भाजपमधीलच काही पदाधिकारी सरसावले आहेत. या मतदारसंघात पुढे अंतर्गत कलह अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. अंतर्गत धुसफूस सुरू असल्याने धुळ्यासह जळगाव भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. 
 

इतर बातम्या
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...