नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
ताज्या घडामोडी
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची मोर्चेबांधणी
मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळली असून, नाराजांनी त्यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजांना एकत्र आणून फडणवीसांच्या नेतृत्वाविरोधात बुधवारी आवाज उठवला. भाजपच्या आजच्या स्थितीला नेतृत्वच जबाबदार असून, त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारावी, अशा शब्दांत खडसे यांनी फडणवीसांवर शरसंधान सोडले.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला. त्यासाठी कार्यकर्त्यांना हाताशी धरले गेले होते. पक्षातील बहुजन आणि ओबीसी नेते निवडणुकीत पराभूत झाले. चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांना निवडणुकीत तिकीट दिले नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम केले असते पक्षाच्या जागा वाढल्या असत्या, असे सांगत खडसे यांनी निवडणुकीतील अपयशाचे खापर फडणवीस यांच्यावर फोडले.
निवडणुकीत उमेदवारी नाकारणे, पक्षातील महत्त्वाच्या उमेदवारांचा झालेला धक्कादायक पराभव आणि निवडणुकीनंतर सत्तास्थापन करण्यात आलेले अपयश, या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये फडणवीस यांच्या विरोधात असंतोष खदखदत आहे. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट टाकून आपल्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली. पंकजा या १२ डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे, विनोद तावडे, राम शिंदे यांनी मुंडे यांची भेट घेतली. या निमित्ताने भाजपमधील नाराजांचा गट फडणवीस यांच्या विरोधात उभा राहताना दिसत आहे. पंकजा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी फडणवीस यांच्यावर नाव न घेता त्यांना लक्ष्य केले. या भेटीत रोहिणी खडसेंचा पराभव का झाला? या पराभवाला कोण जबाबदार आहे? याची माहिती आपण दिली. तर पंकजा यांनीही त्यांच्या पराभवाबद्दलची माहिती दिली. ज्यांनी विरोधात काम केले त्यांची नावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिली आहेत.
येत्या ७ डिसेंबरला प्रदेशाध्यक्ष जळगावला येत आहेत. त्या वेळी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे. पक्षात जे घडत आहे त्याबद्दल अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता वरिष्ठांच्या कानावर घातली आहे, असे खडसे म्हणाले.