‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद शुक्रवारपासून

VSI
VSI

पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ३१) संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. शाश्‍वतपणा- साखर व तत्संबंधित उद्योगात वैविध्यपणा आणि नावीन्यपूर्णता या विषयावर ही तीनदिवसीय आंतररराष्ट्रीय परिषद होणार आहे. उद्‍घाटनच्या कार्यक्रमात आंतराष्ट्रीय साखर संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ऑरिव्ह यांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी मंगळवारी (ता.२८) पत्रकार परिषदेमध्ये दिली. परिषदेबरोबरच साखर उद्योगासंदर्भातील प्रदर्शन आणि विविध प्रकारच्या ऊस लागवडीचे सादरीकरण संस्थेच्या प्रक्षेत्रावर करण्यात आले आहे. या परिषदेला विविध देश विदेशातील साखर आणि ऊस तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.  परिषदेच्या तांत्रिक सत्रामध्ये ६८ व्याख्याने १३ वेगवेगळ्या सत्रांमध्ये असणार आहेत. तसेच देश, विदेशातील संशोधकांची १६५ संशोधने सादर केली जाणार आहेत. यामध्ये इंग्लंड, फिलिपिन्स, थायलंड, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जपान, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, बेल्जियम, इजिप्त, चीन, सुदान, स्वीडन, इंडोनेशिया, इस्त्राईल, फिजी आणि मालावी आदी २१ देशांच्या संशोधकांचा समावेश असणार आहे. उद्‍घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबचे सहकारमंत्री सुखविंदरसिंह रंधवा, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, कामगार आणि उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, जल आणि मृद संधारणमंत्री शंकरराव गडाख, राज्य सहकार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर कारखाना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक पिट्टे आदी उपस्थित राहणार आहेत. साखर परिषदेत महत्वाचे

  • ९८ ऊस प्रात्यक्षिकांचे सादरीकरण असणार
  • अभियांत्रिकी विभागात २२५ स्टॉल असणार आहेत
  • १३ सत्रांमध्ये तज्ज्ञांची  ६८ व्याख्याने
  • देश, विदेशातील संशोधकांची १६५ संशोधने सादर होतील
  • २१ देशांतील संशोधकांचा समावेश
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com