agriculture news in marathi International sugar prices rises will benefit Indian industry | Page 2 ||| Agrowon

साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील सर्वाधिक भाव

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीची झळाळी कायम असून, साखरेचे भाव विक्रमी ५०० डॉलर प्रति टनापर्यंत (३७,००० रुपये) गेले आहेत. दराची उसळी साखर उद्योगाला आश्‍वासक मार्ग दाखवत आहे.

कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीची झळाळी कायम असून, साखरेचे भाव विक्रमी ५०० डॉलर प्रति टनापर्यंत (३७,००० रुपये) गेले आहेत. दराची उसळी साखर उद्योगाला आश्‍वासक मार्ग दाखवत आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत गेल्या सप्ताहात मिळालेला हा सर्वाधिक दर असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. ही दर वाढ इथून पुढील काळात भारताच्या पथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.  

..ऑगस्टची झळाळी
ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासूनच साखरेच्या (पांढरी साखर) दरात वाढती तेजी दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत अपवाद वगळता साखर दराची वाढ कायम दिसते. दररोज पाच ते सहा डॉलरने साखर दर वाढत आहेत. जुलै महिन्याच्या शेवटी साखरेचे दर ४६० डॉलर प्रति टनापर्यंत होते. यात वाढ होत ऑगस्ट मध्याला दराने ५०० चा पल्ला पार केला. १८ ऑगस्टला उच्चांकी ५०९ डॉलर इतका दर झाला. १२ ते १९ ऑगस्ट या कालावधीत ५०० किंवा ५०० डॉलरच्या आसपास दर मिळत असल्याने साखर उद्योगात ‘खुशीकी लहर’ दिसून येत असल्याचे दिसते. 

भारताला संधी
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी भारतीय साखर उद्योगाला प्रेरित करत आहे. गेल्या वर्षी ब्राझीलची साखर असतानादेखील भारताने उद्दिष्टा इतकी म्हणजे ६० लाख टनांपेक्षा जास्त साखर प्रत्यक्षात निर्यात केली. यंदा ब्राझील दुष्काळाच्या खाईत आहे. यामुळे तेथील साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. पुढील वर्षीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. याचा अनुकूल परिणाम भारतीय बाजारपेठेतील साखरेच्या मागणीवर होऊ शकतो. काही देशात साखर उत्पादन वाढणार असले, तरी त्यांची साखर बाजारपेठेत येण्यास विलंब लागू शकतो.

कारखान्यांनी एकदम साखर न विकता थोड्या थोड्या प्रमाणात जसे दर वाढतील तशी सावधगिरी बाळगून साखरेची विक्री केल्यास साखरेचे रखडलेले अर्थचक्र गतीने पुढे जाऊ शकते, असा विश्‍वास साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. भारतात साखर उत्पादनाच्या बाबतीत गेल्या वर्षी सारखीच यंदा ही परिस्थिती आहे. यामुळे  जरी जादा साखरनिर्मिती होणार असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दराच्या बाबतीत होणाऱ्या घडामोडी साखर उद्योगासाठी चांगल्या ठरतील. आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढत असल्याने स्थानिक बाजारातील दर चांगले राहण्याची शक्यता आहे. स्थानिक साखरेची विक्री चांगल्या दरानेच होईल असा विश्‍वास साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला.

सहा महिन्यांतील साखरेचे सरासरी आंतरराष्ट्रीय दर  (डॉलर/प्रति टन)
महिना (दर)
फेब्रुवारी :  ४५०, मार्च : ४४०, एप्रिल : ४६०, मे : ४६०, जून : ४४०, जुलै : ४५०, ऑगस्ट (१८ पर्यंत) : ४७०

कच्च्या साखरेतही तेजीची शक्यता
भारतातील कच्च्या साखरेवर सौदी अरेबिया, दुबई, बांगलादेश, इंडोनेशिया आदी देशासह भारतातील कांडला, काकीनाडा या भागातील रिफायनरी अवलंबून आहेत. या रिफायनरींना यंदाच्या हंगामात कच्च्या साखरेची मोठी गरज लागणार आहे. पक्क्या साखरेबरोबर कच्च्या साखरेचे दर ही त्याच तुलनेत वाढत असल्याने कच्ची साखरनिर्मिती ही फायदेशीर ठरणार असल्याचे संकेत आहे. भविष्यात कच्ची साखर निर्मिती ही तितकीच फायदेशीर होऊ शकेल याकडे कारखानदारांनी गांभीर्याने लक्ष दिल्यास सध्या सुरू असणारा तेजीचा माहोल जास्त काळ सुरू राहू शकतो, त्याचा फायदा भारतीय साखरेला होऊ शकतो असे साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया..
आंतरराष्ट्रीय स्थानिक बाजारात साखरेचे दर चांगले वाढत असले, तरी कारखानदारांनी एकदम साखरेची विक्री एकदम न करता थोड्या थोड्या प्रमाणात करून चांगल्या दराचा लाभ करून घ्यावा. एकदम साखर विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास मागणी कमी होऊन दर ही कमी होण्याची शक्यता असते. गेल्या पंधरा दिवसांपासून आश्‍वासक दरवाढ झाली आहे. साखरेची विक्री नियोजन पद्धतीने केल्यास साखर कारखानदार ‘लाँग टर्म’ फायदा घेऊ शकतात. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता इथून पुढील काही महिने तरी साखर दराची तेजी टिकून राहील अशी शक्यता आहे.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर संपादकीय
रीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...
व्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...
शुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...
वाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...
शुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...
कात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...
घातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...
ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...
‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...
दिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
अन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...
शेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...
इथेनॉलयुक्त भारतातूनच साधेल इंधन...भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस...
डीबीटी’ लाभदायकच!  कृषी विभागांतर्गतच्या विविध योजनांचा एक हजार...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
दिलासादायक दरवाढखरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...
शर्यतीच्या बैलांची निवड आणि संगोपनशर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते...
बैलगाडा शर्यत ः ग्रामीण अर्थकारणाचे साधनबैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे....
‘सिट्रस इस्टेट’ला गतिमान करा विदर्भातील संत्रा या फळपिकाची उत्पादकता वाढवून...
जीवदान अन् दाणादाणहीयावर्षी जूनमध्ये ऐन पेरणीच्या हंगामातील पावसाचा...