पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज मुलाखती

Interviews for the post of President of Pune Zilla Parishad
Interviews for the post of President of Pune Zilla Parishad

पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे. त्यासाठी इच्छुक सदस्यांकडून अर्ज मागविले असून स्वतः अजित पवार हे मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे लवकरच नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची निवड होणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे. मात्र, नवीन निवडीचा कार्यक्रम अजूनही जाहीर झालेला नाही. तरीही पक्षाकडून इच्छुकांचे अर्ज मागविल्याने इच्छुक महिला सदस्यांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. 

त्यामध्ये प्रामुख्याने हवेली तालुक्यातील कीर्ती कांचन, अर्चना कामठे, पूजा पारगे, अनित इंगळे, विद्यमान सभापती राणी शेळके, सुजाता पवार, मावळमधील शोभा कदम, आंबेगावमधून तुलसी भोर, अरूणा थोरात, शिरूरमधून स्वांती पाचुंदकर यांची नावे चर्चेत आहेत. या इच्छुकांमधून एका महिला सदस्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळणार आहे. 

उपाध्यक्ष पदासाठी वीरधवल जगदाळे, बाबुराव जगदाळे, बाबुराव वायकर, पांडुरंग पवार, प्रमोद काकडे, अभिजित तांबिले यांची नावे चर्चेत आहेत. तर अन्य सभापती पदासाठी अनेक व्यक्ती इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाने इच्छुकाकडून बायोडेटासह अर्ज मागविले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com