ओळख पशू संस्थांची...पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, गोखलेनगर,पुणे

rearing of desi goat breed
rearing of desi goat breed

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात १-११-७९ रोजी पशुसंवर्धन खात्यातील नऊ मेष पैदास प्रक्षेत्र आणि एक लोकर उपयोगिता केंद्र हस्तांतरित झाल्यानंतर झाली. ६ जुलै २०१० पासून आदिवासी गोवारी शहीद स्मृती शेळी व पशुपालन संस्था (खोंद्री, जि. नागपूर) महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. सध्या महामंडळाकडे एकूण १० प्रक्षेत्र व १ लोकर उपयोगिता केंद्र आहे. यामध्ये बिलाखेड (जळगाव), पाडेगाव (औरंगाबाद), अंबेजोगाई (बीड), मुखेड (नांदेड), तीर्थ (उस्मानाबाद), महूद (सोलापूर), दहिवडी (सातारा), रांजणी (सांगली), पोहरा (अमरावती), बोंद्री(नागपूर), लोकर उपयोगिता केंद्र, (गोखलेनगर, पुणे) या केंद्रांचा समावेश आहे. उद्दिष्ट्ये

  • महाराष्ट्रात विदेशी/ स्थानिक/ संकरित मेंढ्यांची पैदास प्रक्षेत्र स्थापना व त्यांचा विस्तार.  
  • शेळ्या-मेंढ्यांच्या पैदाशीकरिता उपयुक्त ठिकाणी केंद्रांची वाढ करणे.  
  • शेळ्या/ मेंढ्या आणि त्यापासून उत्पादित होणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात करणे, शेळ्या-मेंढ्यांची पैदास करणे आणि विक्री करणे.  
  • स्थानिक शेळ्या-मेंढ्यांची जात सुधारण्यासाठी संकरित पैदास कार्यक्रम हाती घेणे किंवा कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला मदत करणे.  
  • शेळ्या, मेंढ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून पशुपालकांना चांगल्या शेळ्या, मेंढ्या देणे.  
  • उत्पादन वाढ होऊन शेळी-मेंढी पालन फायदेशीर होण्यासाठी शासनाच्या मदतीने/ मदतीशिवाय विस्तार केंद्रे स्थापणे.  
  • शेळी-मेंढीपालनाला उत्तेजन देण्यासाठी सहकारी संस्था, व्यक्ती किंवा फार्म यांना वित्तीय पुरवठा करण्याकरिता मदत करणे.
  • संचालक मंडळ यामध्ये १२ सदस्य आहेत. त्यामध्ये ९ अशासकीय आणि ३ शासकीय सदस्यांचा समावेश असतो. यामध्ये शासकीय सदस्य खालीलप्रमाणे

  • मा. आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे.  
  • मा. उपसचिव पशुसंवर्धन (पदूम) मंत्रालय, मुंबई.  
  • मा. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्‍लोक अहल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे.
  • प्रक्षेत्रावर पैदाशीकरिता शेळ्या आणि मेंढ्यांच्या जाती

  • एकूण १० प्रक्षेत्रावर संगमनेरी, लोणंद, दख्खनी या मेंढ्यांसह उस्मानाबादी, संगमनेरी, सिरोही, बेरारी या शेळ्यांच्या प्रजाती आहेत.
  • राबविण्यात येणारे उपक्रम

  • वैरण विकास कार्यक्रमअंतर्गत उपलब्ध प्रक्षेत्रावर वैरण उत्पादन.  
  • सुधारित जातीचे चारा बियाणे व संकरित गवतांचे ठोंबे उत्पादन करून शेळी-मेंढी पालकांना रास्त दरात उपलब्ध करून दिले जातात.  
  • महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर तीन दिवसांच्या प्रात्यक्षिकासह शेळी-मेंढी पालन व्यवस्थापनाची प्रशिक्षणासाठी सोय उपलब्ध आहे. विविध जाती, निवारा, आहार व्यवस्थापन, आरोग्य, करडांची निगा, दैनंदिन व्यवस्थापन, विमा, पैदास, चारापिके लागवड व विक्री व्यवस्था या विषयांवर प्रशिक्षण दिले जाते.  
  • पैदाशीकरिता बोकड/ मेंढेनर/ शेळ्या-मेंढ्या पुरवठा पशुपालकांना करण्यात येतो. प्रगतिशील पशुपालकांकडून जातिवंत बोकड/ मेंढे तसेच शेळ्या/ मेंढ्या उपलब्ध करून पुरवठा करण्यात येतो.  
  • शेळ्या-मेंढ्यांकरिता उपयुक्त असलेल्या चारा वृक्षांची रोपवाटिका प्रत्येक प्रक्षेत्रावर तयार करून वापर केला जातो. ॲझोला व गांडूळखत प्रकल्प स्थापन करून खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे.  
  • ब्रुसेला रोग तपासणी करून कुर्बानीकरिता बोकड/ मेंढे नर विक्रीची सोय.  
  • राज्यातील दख्खनी जातीच्या मेंढ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळाच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या मेष व लोकर विकास कार्यक्रमांतर्गत एकूण ५,५०२ मेंढपाळांच्या ५,००,२३९ मेंढ्या दत्तक घेण्यात आल्या आहेत. तसेच पैदाशीकरिता मेंढेनर पुरवठाअंतर्गत मागील चार वर्षांत एकूण ७८० नर मेंढेपुरवठा करण्यात आले आहेत.  
  • सर्व प्रक्षेत्रामार्फत मेंढपाळाकडील मेंढ्यांना, जंतनाशक, लसीकरण प्रतिजैविक औषधोपचार, बाह्यकीटक निर्मूलन असे उपक्रम राबविले जातात.  
  • राज्यातील स्थानिक मेंढ्यांपासून उपलब्ध होणाऱ्या लोकरीसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच राज्यामध्ये पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या लोकर विणकाम व्यवसायाचे जतन करून लोकांना माहिती देणे व स्थानिक मेंढ्यांच्या लोकरीपासून वस्तू उत्पादित करणे हा मुख्य उद्देश विचारात घेऊन महामंडळामार्फत गोखलेनगर (पुणे), पडेगाव (औरंगाबाद), रांजणी (सांगली) या ठिकाणी लोकर विणकाम व उपयोगिता केंद्र स्थापन करून जेन, चादर, सतरंजी, पूजा आसन, चेअर कारपेट, गालिचा, लोकर पिलो, गादी तसेच विविध प्रकारच्या घोंगडी तयार करून विक्री केले जातात.
  • संपर्कः डॉ. व्यंकटराव घोरपडे, ०२० २५६५७११२ ( लेखक पशुसंवर्धन विभागाचे सेवानिवृत्त सहा.आयुक्त आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com