agriculture news in marathi Introduction of mushroom Production | Agrowon

ओळख अळिंबी उत्पादनाची...

डॉ. अनिल गायकवाड 
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल.
 

अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध होईल.

प्राचीन काळापासून अळिंबीचे सेवन केले जात आहे. ग्रीक लोकांनी प्रथम अळिंबीचा खाण्यासाठी वापर सुरू केला. रोमन लोक अळिंबीला ‘देवाचे खाणे’ समजत. त्यांच्या मते, अळिंबी अधिक ताकद व उत्साह वाढवण्यास मदत होते. जगभरात मशरूम स्वादिष्ट अन्न म्हणून आवडीने खाल्ले जाते. ताज्या अळिंबीपासून जास्त पैसे मिळत असले तरी प्रक्रियायुक्त अळिंबी पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. अळिंबीच्या विविध पाककृतींना अतिशय चांगली मागणी आहे. 

अळिंबीची मागणी 

 • जगभरामध्ये सर्वांत जास्त बटण अळिंबीची लागवड केली जाते. त्यानंतर अनुक्रमे ऑईस्टर म्हणजेच धिंगरी, शिताके, ब्लॅक इअर, हिवाळी अळिंबी, भात पेंढ्यावरील अळिंबीची लागवड केली जाते. 
 • भारतामध्ये सर्वांत जास्त बटण अळिंबी त्यानंतर धिंगरी, भात पेंढ्यावरील अळिंबी, दुधी अळिंबी लागवड होते. 
 • भारतामध्ये हरियाना राज्यात अळिंबीची सर्वांत जास्त (१४ टक्के) लागवड होते. सध्या महाराष्ट्रामध्ये बटण अळिंबीचे ३६, धिंगरी अळिंबीचे ३७१ आणि दुधी अळिंबीचे ४ प्रकल्प आहेत. त्यातून अनुक्रमे २४,२५० टन, ३९६ टन व १.५  टन अळिंबी उत्पादन प्रतिवर्षी होते. 
 • भारतामध्ये लोकसंखेच्या तुलनेत अळिंबीचे उत्पादन फार कमी आहे. महाराष्ट्रात अळिंबी उत्पादनास भरपूर वाव आहे. लोकांमधील अळिंबी खाण्याबाबत गैरसमज दूर करणे, अळिंबी खाण्यास प्रवृत्त करणे, विक्रीची साखळी निर्माण करणे या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अळिंबीचे महत्त्व पटवून दिल्यास या पिकास भविष्यात निश्‍चित चांगली मागणी मिळेल.

अळिंबीबाबत महत्त्वाचे 

 • अळिंबीच्या मुळांव्यतिरिक्त सर्व भाग खाण्यायोग्य असतात. 
 • जंगली अळिंबी माहिती असल्याशिवाय खाऊ नये.
 • अळिंबीचा भाजी करताना फक्त १० ते १५ मिनिटे शिजवावे. 
 • अळिंबी जास्त वेळ पाण्यात धुतल्यास त्यातील जीवनसत्त्वे होतात. तसेच पाण्यामुळे  अळिंबी सडण्याची प्रक्रिया सुरू नष्ट  होते.

अळिंबीचे प्रमुख भाग 
अळिंबीच्या सर्वांत वर छत्री, त्याखाली पटल (पापुद्रा/गिल), देठ (स्टॉक/स्टाइप), जमिनीखाली किंवा पाचोळ्याखाली ‘व्होल्वा’ व व्होल्वालाच बुरशीचे धागे (मायसेलियम) असतात. प्रत्येक अळिंबीला ही सर्व अंगे असतातच असे नाही.

बी 

 • अळिंबीच्या बीजुकांना ‘स्पोअर’ असेही म्हणतात. या बीजुकांची उगवण झाल्यानंतर त्यापासून बुरशीच्या धाग्यांची (मायसेलियम) निर्मिती होते.
 • बुरशीच्या धाग्यांचे झाडांच्या मूलिकांबरोबर सहजीवन वर्षानुवर्षे चालू असते. त्याचा झाडांना त्रास होत नाही. हे बुरशीचे धागे काही प्रमाणात परजीवी असतात.
 • काही बुरशींचे प्रकार विशिष्ट प्रकारच्या झाडांच्या मूलिकांशीच निगडित असतात. या जातींचा विशिष्ट झाडांच्या मूलिकांशी  संबंध आला, तरच अळिंबीची निर्मिती होते. 
 • बुरशीच्या धाग्यापासून देखील अळिंबीची निर्मिती होऊ शकते. अळिंबीची छत्री उघडल्यावर अळिंबीची बीजुके खाली पडतात.त्यापासून धाग्यांची निर्मिती सुरू होते. 
 • प्रयोगशाळेत बीजुके किंवा धाग्याचे तुकडे यांपासून योग्य त्या माध्यमावर बुरशीची वाढ होऊ शकते. आणि त्यापासून अळिंबीचे बियाणे (स्पॉन) तयार होऊ शकतात.

फलांगे 

 • बुरशीच्या धाग्यापासून अळिंबीचा देठ व छत्री या फलांगांची निर्मिती होते. यासाठी विशिष्ट तापमान, आर्द्रता व प्रकाशाची गरज असते. अशा स्थितीत बुरशीचा धागा साठविलेल्या अन्नातून प्राथमिक अंकुरांची (प्रायमोर्डिया) निर्मिती करतो. त्यानंतर पुढे त्यापासून देठ (खोड) व छत्री ही फलांगे तयार होतात. 
 • त्याचबरोबर नवीन बीजुकेही तयार होतात. याच बीजुकांपासून बुरशीचे धागे व नंतर स्पॉन तयार होतात. पुरेसे अन्न व अनुकूल वातावरण मिळाल्यावरच फलांगे तयार होतात.
 • नैसर्गिकरीत्या अळिंबी वर्षातून एकदाच  (बहुतेक करून पावसाळ्यात) तयार होतात.फलांगे तयार होण्याचा काळ वेगवेगळा असतो. प्रयोगशाळेत काही बुरशींची फलांगे १० दिवसांत तयार होतात. तर निसर्गतः काही जातींची फलांगे तयार होण्यास वर्षही लागते.

थोडक्यात महत्त्वाचे 

 • पावसाळ्यात जंगलात मेलेल्या जनावरांच्या अवशेषांवर किंवा तुटून पडलेल्या लाकडांवर अळिंबी उगविलेली दिसते. 
 • मोरेल्स सारख्या अळंबीच्या चवदार जाती थंड प्रदेशात टेकड्यांवर दिसतात. वणव्यामुळे जळालेल्या जंगलात हवामान थंड व अनुकूल असेल तर मोरेल्स उगवलेली दिसतात. 
 • पोषणमूल्यांचा दृष्टीने विचार केल्यास अळिंबीची ताज्या पालेभाजीशी तुलना करता येईल. काही अळिंबीमध्ये फॉलिक आम्ल भरपूर  प्रमाणात असते. त्यामुळे पंडू रोग (ॲनिमिया) असलेल्यांनी अळिंबी खावी.
 •  दररोजच्या आहारात १०० ते २०० ग्रॅम अळिंबी खाल्यास पोषणमूल्यांचे संतुलन चांगले राहते. अळिंबीतील ७२ ते ८३ टक्के प्रथिने पचनास योग्य असतात.

अळिंबीचे उत्पादन 

 • अळिंबी मुख्यत्वे तीन गटांत विभागली जाते. खाण्याची अळिंबी (५४%), औषधी (३८%) आणि रानटी (८%). 
 • अळिंबीची सर्वांत जास्त लागवड चीनमध्ये केली जाते. 
 • जगातील एकूण अळिंबी उत्पादनात चीनचा ४० ते ४५ टक्के आणि भारताचा वाटा ०.१५ टक्का.  स्थानी.
 •  भारत जागतिक पातळीवर अळिंबी उत्पादनामध्ये असून १४ व्या

उत्पादनासाठी महत्त्वाच्या बाबी 

 • अळिंबी उत्पादनासाठी नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
 • अळिंबी उत्पादनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. लागवड करणाऱ्या व्यक्तीने स्वच्छता पाळावी.
 • अळिंबीचे उत्पादनासाठी बंदिस्त जागेची निवड करावी.
 • अळिंबी उत्पादनाच्या खोलीत खेळती हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
 • खोलीतील तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते ९० टक्के राहील याची दक्षता घ्यावी.
 • खोलीमध्ये जास्त सूर्यप्रकाश येऊ देऊ नये. अंधूक प्रकाश ठेवावा.
 • काडाचे निर्जंतुकीकरण योग्य पद्धतीने करावे.
 • अळिंबीचे बियाणे खात्रीशीर संस्थेकडून घ्यावे.
 • पिशव्या भरण्यापूर्वी काड जास्त ओले नाही याची खात्री करावी.
 • अळिंबी बेडवर स्वच्छ पाण्याची फवारणी करावी.
 • रॅक किंवा शिंकाळ्यावर मांडणी करताना दोन पिशव्यांतील अंतर ९ ते १० इंच ठेवावे.
 • रोग व किडींचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • प्रकल्पास दररोज भेट द्यावी. त्यामुळे निर्माण होणाऱ्या नवीन अडचणींचे निरीक्षण करता येईल.
 • काढणी वेळेत करून योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे.
 • उन्हात किंवा ड्रायरमध्ये अळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी. 

संपर्क ः डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११   
(लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत)


इतर कृषिपूरक
दूध संकलन केंद्रावर घ्यावयाची दक्षतादूध संकलन केंद्र स्वच्छ आणि हवेशीर असावे. जमिनीवर...
स्वच्छ, सुरक्षित दूध उत्पादनाचे तंत्रअसुरक्षित दुधापासून क्षय, विषमज्वर, अतिसार, कॉलरा...
औषधी अळिंबीचे आहारातील महत्त्वअळिंबीमध्ये मॉइश्‍चरायझिंग गुणधर्म असतात. हे...
शेळ्या, मेंढ्यांचे हिवाळ्यातील संगोपनशेळी-मेंढीची निवड करताना किंवा व्यवसाय सुरू...
जनावरांतील विषाणूजन्य आजार ः तिवातिवा आजार होण्याचे प्रमाण सुदृढ प्रकृतीच्या, अधिक...
कोणत्या गुणधर्माच्या पीकजातींची पैदास...एखाद्या पिकातील योग्य ते गुणधर्म पुढील पिढीमध्ये...
थंडीमध्ये द्या जनावरांना पोषक आहार हिवाळ्यात जनावरांना शारीरिक तापमान संतुलित...
लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी लसीकरण हाच...लाळ्या खुरकूत हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा...
चिंचेपासून जॅम, जेली, स्क्वॅशमहाराष्ट्रात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...
कासदाहाकडे नको दुर्लक्ष... कासदाहाचा प्रसार दूषित पाणी, दूषित उपकरणे तसेच...
जनावरांतील पोटाचे आजार कसे ओळखाल?जनावरांना रवंथ करण्यासाठी दिवसातून किमान ८-१०...
नवीन प्राणिजन्य आजार ः क्रिमियन काँगो...क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार...
ओळख अळिंबी उत्पादनाची...अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
काळपुळी आजाराबाबत दक्ष राहा...साधारणपणे २ ते ३ तास आधी निरोगी दिसणाऱ्या...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
जनावरांना द्या संतुलित आहारगाई, म्हशींसाठी, संतुलित आहार नियोजन केल्यास...
अळिंबी उत्पादनात मोठी संधी अळिंबीची व्यावसायिक शेती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
जनावरांतील गोचीड तापगोचीड ताप अनेक दिवस राहू शकतो. या आजारामुळे...
मुधोळ हाऊंड श्वानास राष्ट्रीय मान्यतामुधोळ हाऊंड ही श्वान जात महाराष्ट्र आणि...