शिवस्मारक निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचार, अनियमिततेची चौकशी करा ः धनंजय मुंडे

Investigate corruption, irregularities in the Shiv Smarak tender process ः Munde
Investigate corruption, irregularities in the Shiv Smarak tender process ः Munde

नागपूर ः छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या तत्कालीन भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याचे पाप केले असून, यामुळेच नियतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी बुधवारी (ता. १८) विधानसभेत केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावर ते बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते आमदार मुंडे यांच्यामध्ये सभागृहात आरोप- प्रत्यारोपांचा ‘सामना’ चांगलाच रंगला. फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना मुंडे यांनी फडणवीसांना तीन चाकांचे विमानही असते, अशी आठवण करून देत तुम्हाला पुन्हा यायला ५ नाही तर १५ वर्षे वाट बघावी लागेल, असा टोलाही लगावला.

या वेळी मुंडे यांनी आपल्याच एका भाषणाचा संदर्भ देत ‘‘पवारांचा नाद करू नका, असे सांगून पवार हा एक विचार आहे, तो कळायला दहा जन्म अपुरे पडतील,’’ असा टोला फडणवीसांना लगावला. 

विविध विकासकामांना हे सरकार स्थगिती देत सुटले आहे, असे म्हणत फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला असता, ग्रामविकास विभागामार्फत २५-१५ च्या कामांमध्ये अनियमितता असून पूर्वीच्या सरकारने विकासकामांमध्ये पक्षपातीपणा केला असल्याचा गंभीर आरोपही मुंडेंनी आपल्या भाषणात केला. 

पंतप्रधान मोदींना आणून मोठा गवगवा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मुंडे यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तर देणारच आहे, सोबतच दिलेला प्रत्येक शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही मुंडे बोलताना म्हणाले.

पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून फसवणूक तर केलीच, परंतु ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ या म्हणीप्रमाणे शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला, म्हणूनच भाजपच्या हातून नियतीने सत्ता हिरावून घेतली, असे परखड मतही धनंजय मुंडे यांनी बोलताना व्यक्त केले.

सभागृहात जुगलबंदी, शेरोशायरी दरम्यान ‘मी पुन्हा येईन’वरून पुन्हा एकदा सभागृहात जुगलबंदी व शेरोशायरी पाहायला मिळाली. सत्ता पक्षाच्या वतीने धनंजय मुंडे यांनी ‘ये कैचियाँ खाक हमे रोकेंगी, हम परो से नही, हौसलो से उडा करते हैं!’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देत आमचे सरकार १५ वर्षे टिकणार असून, तुम्हाला पुन्हा येण्यासाठी तेवढी प्रतीक्षा करावी लागेल, असा टोलाही लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com