agriculture news in marathi Investigate the dead fish in the mill : Bhuse | Agrowon

‘गिरणा’तील मृत मासळीची चौकशी करा : भुसे

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

नाशिक : ‘‘गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. ``

नाशिक : ‘‘गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील मासळी मृत झाली आहे. मासेमारी करणाऱ्या ठेकेदारासोबतच तेथे कर्तव्यास असणाऱ्यांची चौकशी करा,’’ असे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

गिरणा धरणातील पाण्यात विषारी द्रव्याचा वापर केला. त्यामुळे प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवारी (ता.१६) झाली. उपमहापौर नीलेश आहेर, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, गिरणा धरणाचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, पशुधन विकास अधिकारी कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले यांच्याबरोबरच पोलिस प्रशासनासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भुसे म्हणाले, ‘‘धरणातील मृत मासळीच्या सेवनामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. यामुळे धरणातील मृत मासळी खुल्या बाजारात विक्री होता कामा नये, यासाठी पोलिस प्रशासनाने तत्काळ संबंधित ठेकेदारास ताब्यात घेऊन मृत मासळी तत्काळ नष्ट करा. त्याच बरोबर धरणातून ज्या पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात, त्या पाणी तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत थांबवा.’’ 

‘‘पारंपरिक पद्धतीने मासेमारी न करता मासेमारी सुकर होण्यासाठी काही समाजकंटक विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु , यामुळे नागरिकांच्या जीविताशी होणारा खेळ खपवून घेणार नाही. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

‘तळवाडे’तून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा

गिरणा धरण परिसरात मोठ्या प्रमाणात मृत मासे आढळल्याने मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तळवाडे धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले. मालेगाव शहरासाठी पाणीपुरवठा करणारे पंपिंग स्टेशन खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्याचे आदेश कासार यांनी दिले.  
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...