पीकविमा गैरप्रकाराची सीआयडीतर्फे चौकशी करा : आमदार डॉ. पाटील

पीकविमा गैरप्रकाराची सीआयडीतर्फे चौकशी करा : आमदार डॉ. पाटील
पीकविमा गैरप्रकाराची सीआयडीतर्फे चौकशी करा : आमदार डॉ. पाटील

परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या खरीप, रब्बी हंगामात बोबडे टाकळी (ता. परभणी) येथे पीकविमा प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना बनावट पावत्या देण्यात आल्या. विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीकडे न भरून फसवणूक करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणातील संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करा. या प्रकरणाची सीआयडीकून चौकशी करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे केली.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत बोबडे टाकळी येथील ३५० शेतकऱ्यांनी साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप, रब्बी पिकांचे विमा प्रस्ताव ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालकांकडे सादर केले होते. त्यानंतर विमा परतावा खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली. परंतु बोबडेटाकळी येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम जमा होत नव्हती. 

शेतकऱ्यांनी संगणक परिचालकाकडे विचारणा केली. त्याने विमा प्रस्तावातील चुका दुरुस्त करून अर्ज विमा कंपनीकडे पाठविल्याचे सांगितले. मात्र प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती देण्यास टाळाटाळ केली. पोचपावत्या मिळालेल्या शेतकऱ्यांनी इफ्को टोकियो जनरल इन्शुरंस कंपनीच्या प्रतिनिधीकडे चौकशी केली. त्या वेळी त्या पावत्या बनावट आहे. परिचालकाने विमा कंपनीकडे विमा हप्त्याची रक्कम भरली नसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com