स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली, विळेगाव ग्रामपंचायतींची तपासणी

स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली, विळेगाव ग्रामपंचायतींची तपासणी
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली, विळेगाव ग्रामपंचायतींची तपासणी

वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे स्मार्टग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, मानोरा तालुक्यांतील गिरोली आणि कारंजा तालुक्यांतील विळेगाव या ग्रामपंचायतीची तपासणी जिल्हा तपासणी समितीने पथकाने केली.  मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मिना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तपासणी समितीच्या सदस्यांनी स्मार्टग्रामअंतर्गत गावातील वस्तुस्थिती जाणून घेतली. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्यंकट जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तापी, प्रकल्प संचालक तथा गटविकास अधिकारी सुरज गोहाड, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश राठोड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता खडसे, मंगरुळपीरगट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, कृषी अधिकारी शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदी या वेळी उपस्थित होते. शासन निकषानुसार या वेळी गावातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. गावातील सुविधांची पाहणी करीत लीना बनसोड यांनी महिलांशी संवाद साधला. गावातील शाळा, अंगणवाडी तसेच इतर शासकीय इमारतीमधील स्वच्छतेच्या सुविधांची तपासणी करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com