राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची मोहीम

मालेगावी महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून तपासणी; ४० जणांवर कारवाई
मालेगावी महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडून तपासणी; ४० जणांवर कारवाई

नाशिक : मालेगाव येथे प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिक बनवणाऱ्या उद्योग व व्यवसायावर कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले होते, त्याअनुषंगाने महावितरणच्या कोकण प्रादेशिक परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी बुधवारी (ता. २६) येथील बंद कारखान्याची अनधिकृत वीज वापराबाबत रात्री आकस्मिक तपासणी केली. यामध्ये एका प्लॅस्टिक कारखाना समवेत ४० विविध वर्गवारीच्या ग्राहकांवर वीज चोरी व अनधिकृत वापरासंदर्भात कारवाई करण्यात आल्याची माहिती नाशिक महावितरण परिमंडळाच्या सूत्रांनी दिली.  प्रदूषण होत असल्याने प्लॅस्टिकची निर्मिती व पुनर्निर्माण करणाऱ्या २३३ कारखान्यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून व इतर विभागाकडून सील करण्यात आले होते. यासंदर्भात महावितरणकडूनसही सदर कारखान्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र सदर कारखाने यांचा बेकायदेशीर वीज वापर संदर्भात तपासणीसाठी महावितरणच्या कोकण परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक श्री. नाळे यांनी महावितरण आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने रात्रीच्या वेळी चोरी शक्यतेच्या काळात तपासणी मोहीम राबविली. यामध्ये अधीक्षक अभियंता रमेश सानप, कार्यकारी अभियंते संदीप दरवडे, उपकार्यकारी अभियंते व जनमित्र यांचा सहभाग होता.  मोहिमेदरम्यान एक प्लॅस्टिक कारखाना येथे वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. यासोबतच शहरामध्ये भरारी पथके निर्माण करून संध्याकाळी २ तासात भारतीय वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार ३७ ग्राहकांवर तर १२६ नुसार ३ जणांवर कारवाई करण्यात आली.  यासोबतच मालेगाव मंडळ कार्यालयात महावितरणच्या अभियंते व कर्मचारी यांची बैठक घेण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com